BIG BREAKING | कर्नाटककडून महाराष्ट्राच्या बसेसना 'नो एन्ट्री'

विजय पाटील
शुक्रवार, 20 मार्च 2020

कोरोनाचा पहिला बळी कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला होता. त्यानंतर आता कर्नाटक सरकारनं खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. कोरोना पसरु नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. 

सांगली - कोरोनोच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने, महाराष्ट्राच्या बसेसना कर्नाटकमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. सांगलीच्या जत येथील कर्नाटक सीमेवर राज्याच्या एसटींची अडवणूक केली जाते आहे. जत आणि कर्नाटक बॉर्डरवर कर्नाटक पोलीस जतमधील बसेसना परत पाठवल्या जात आहेत.  कर्नाटक सरकारनेही महाराष्ट्रापूरती बस सेवा बंद केली आहे. 

 

कोरोनाचे कर्नाटकमध्ये आतापर्यंत 16 रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात तब्बल 49 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग पसरु नये यासाठी महाराष्ट्राच्या बसेसना कर्नाटक प्रवेश देता येणार नाही आहे. 

 

कोणत्या राज्यात सध्या किती कोरोनाचे रुग्ण आहेत?

 • आंध्र प्रदेश - 2
 • छत्तीसगड - 1
 • दिल्ली - 17
 • गुजरात - 2
 • हरियाणा - 17
 • कर्नाटक - 19
 • केरळ - 26
 • महाराष्ट्र - 49
 • ओडिशा - 1
 • पॉन्डिचेरी - 1
 • पंजाब - 3
 • राजस्थान - 7
 • तामिळनाडू - 3
 • तेलंगणा - 16
 • चंदीगड - 1
 • जम्मू काश्मीर - 1
 • लडाख - 10
 • उत्तर प्रदेश - 19
 • उत्तराखंड - 1
 • पश्चिम बंगाल - 1

 

कोरोनाचा पहिला बळी कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला होता. त्यानंतर आता कर्नाटक सरकारनं खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. कोरोना पसरु नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. 

दरम्यान ,पुण्यानंतर पुणे नागपूरनंतर आता सांगलीतही दारु दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत परमीट रुम बियर बार  बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र सील बंद दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच वाईन शॉप सुरु राहणार आहेत.

 

 

हेही वाचा - अमेरिकेत कोरोनावर औषध सापडलं? मलेरियाचं औषध कोरोनावर चालतं?

हेही वाचा - जगात १० हजारपेक्षा जास्त जणांना कोरोनानं गुळलं?

हेही वाचा - मुंबईतील लोकल प्रवासांची संख्या मोठ्या संख्येनं घटली

 

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

 

karnatak govt restricted maharashtra buses to stop corona covid 19 marathi


संबंधित बातम्या

Saam TV Live