'दोस्ताना 2' नंतर 'फ्रेडी' चित्रपटातून कार्तिक आर्यनला काढले

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 27 मे 2021

शाहरुख खानच्या प्रॉडक्शनसाठी दिलासा मिळाला आहे की या चित्रपटाचे अजून चित्रीकरण सुरु झालेले नाही.

कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) स्वत: साठी बॉलिवूडमध्ये (Bollywood) वेगळा मार्ग निवडलेला दिसतोय. करण जोहरच्या 'दोस्ताना 2'(Kartik Aaryan) नंतर कार्तिकला आणखी एका मोठ्या  चित्रपटातून काढून टाकयणात आले आहे. किंग खानच्या रेड चिलीज प्रॉडक्शनचा चित्रपट 'फ्रेडी' कार्तिक आर्यननेही सोडला आहे, अशी माहिती आहे. या चित्रपटासाठी मिळालेली 2 कोटींची रक्कमही कार्तिकने परत केली आहे.(Karthik Aryan was removed from the Freddy movie)

चित्रपट सोडण्याचं हे आहे  कारण 
मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खानच्या चित्रपटातून कार्तिकच्या बाहेर पडण्यामागील कारण हे ''करण जोहरच्या 'दोस्ताना 2' या चित्रपटा सारखेच आहे. यावेळीही कार्तिकने चित्रपटावर सही करून कथेला मंजुरी दिल्यानंतर पुन्हा स्क्रिप्टमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रोडक्शन हाऊसने त्याला चित्रपटातून बाहेर काढले. 

हे देखील पाहा 

निर्माता  आता नवीन अभिनेत्याच्या शोधात
शाहरुख खानच्या प्रॉडक्शनसाठी दिलासा मिळाला आहे की या चित्रपटाचे अजून चित्रीकरण सुरु झालेले नाही. त्यामुळे कार्तिक बाहेर पडल्याने या चित्रपटाला  फारसा त्रास होणार नाही. आता मुख्य भूमिकेसाठी आणखी एक अभिनेता शोधला जाईल.

उपविभागीय पोलीस अधिकारीऱ्या मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल

ग्वालियरहून  मुंबईला आलेला  कार्तिक आर्यन, ज्याचे खरे नाव कार्तिक तिवारी आहे, याने अलिकडच्या काळात आणखी दोन चित्रपटांचे करार केले आहेत. यापैकी एक चित्रपट तो दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासोबत करणार आहे. तो आरएसव्हीपी निर्माते निर्मित करीत आहे. या चित्रपटात तो एअरफोर्स  पायलट याची भूमिका करेल . दुसरा चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा आहे . या चित्रपटाविषयी अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. कार्तिकच्या टीमने अद्याप रेड चिलीज चित्रपटाविषयी कोणतेही विधान जाहीर केलेले नाही.

Edited By : Pravin Dhamale


संबंधित बातम्या

Saam TV Live