के सी पाडवी यांनी जाणून घेतल्या नर्मदा काठावरील नागरिकांच्या समस्या

KC Padvi learned about the problems of the citizens on the banks of Narmada
KC Padvi learned about the problems of the citizens on the banks of Narmada

नंदुरबार - नर्मदा काठावरील मनिबेली चिमलखेडी हे महाराष्ट्रातील पहिल्या विधानसभा  व लोकसभा मतदार संघातील गावे आहेत. या ठिकाणी पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य यांच्या सोयी नाहीत. KC Padvi learned about the problems of the citizens on the banks of Narmada

आदिवासी मंत्री के सी पाडवी यांनी नर्मदा काठावरील चिमलखेडी येथे दौऱ्या दरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. येथील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी आहे.  

मासेमारी व्यवसायासाठी विशेष तरतूद करून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  तसेच हात पंपाद्वारे पाण्याची सुविधा सोडवणार आहे. 

हे देखील पहा - 

पालकमंत्र्यांनी या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जांगठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण केले आहे. यामुळे पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याच्या सुविधेसाठी मदत होणार आहे. 

विशेष म्हणजे नर्मदा काठावरील सरदार सरोवर प्रकल्पातील बाधितांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आहे. त्यावर लवकरच तोडगा काढणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिले आहे. 

यावेळी आदिवासी मंत्री के सी पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, अधिकारी पदाधिकारी व नागरिक आणि नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Edited By - Puja Bonkile 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com