इस्रायलमध्ये रॉकेटच्या हल्ल्यात केरळमधील महिलेचा मृत्यू

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 12 मे 2021

इस्रायलमधील अश्कलोन येथे हमास रॉकेट हल्ल्यात केअर टेकर म्हणून काम करणारी एक भारतीय नागरिक ठार झाली आहे. ३१ वर्षांच्या सौम्या संतोषच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळी व्हिडिओ कॉलवरून केरळमध्ये राहणाऱ्या पती संतोषशी बोलत असताना अश्कलोन शहरातील तिच्या निवासस्थानावर रॉकेट पडले.

इस्रायल : इस्रायलमधील Israel अश्कलोन Ashkelon येथे हमास रॉकेट हल्ल्यात केअर टेकर म्हणून काम करणारी एक भारतीय नागरिक ठार झाली आहे. ३१ वर्षांच्या सौम्या संतोषच्या Saumya Santosh कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळी व्हिडिओ कॉलवरून केरळमध्ये राहणाऱ्या पती संतोषशी बोलत असताना अश्कलोन शहरातील तिच्या निवासस्थानावर रॉकेट पडले. Kerala woman died in rocket attack in Israel 

"व्हिडिओ कॉल दरम्यान तिच्या भावाला मोठा आवाज ऐकू आला. अचानक फोन डिस्कनेक्ट झाला. त्यानंतर आम्ही ताबडतोब तेथे काम करणाऱ्या मल्याळीशी संपर्क साधला. अशा प्रकारे आम्हाला घटनेची माहिती मिळाली," असे संतोषचा भाऊ साजी यांनी सांगितले.

हे देखील पहा -

सौम्या संतोष, ती केरळच्या Keral इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी आहे. दक्षिणेच्या इस्त्रायली किनारपट्टीच्या शहर अशकलोन येथे रहाणाऱ्या घरात ज्येष्ठ महिलेची देखभाल करणारी म्हणून तिने काम केले. गाझा GAZA पट्टीला लागून असलेले अश्कलोन पॅलेस्टाईन दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. Kerala woman died in rocket attack in Israel 

सावधान! गावात गर्दी कराल तर जाईल सरपंचपद!

सौम्या गेल्या सात वर्षांपासून इस्रायलमध्ये राहत असल्याचे सांगितले जात होते. तिला एक नऊ वर्षांचा मुलगा आहे. तिच्या 80-वर्षीय घराच्या वृद्ध मालकाने सांगितल्यानुसार, ते घराच्या ताफ्यातून बचावले आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार म्हटले आहे. सौम्या ही कंजिकुझी पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश आणि सावित्री यांची मुलगी होती.

नवनिर्वाचित आमदार MLA आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP केरळचे नेते मणि सी कप्पन Mani C Kappan यांनी या घटनेचा निषेध केला.

Edited By- Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live