खडसेंचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश! पक्षप्रवेशावेळी एकनाथ खडसे भावूक तर विरोधकांना दिला कडक इशारा

साम टीव्ही
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

पण 4 वर्ष अतिशय वाईट वागणूक मिळाली. माझा गुन्हा काय? असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन असं सांगून त्यांनी आपल्या विरोधकांना कडक इशाराही दिलाय.

एकनाथ खडसेंनी अखेर आज राष्ट्रवादीत अधिकृतरित्या प्रवेश केलाय. शरद पवारांच्या उपस्थितीत खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. 40 वर्ष भाजपसाठी काम केलं. पण 4 वर्ष अतिशय वाईट वागणूक मिळाली. माझा गुन्हा काय? असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन असं सांगून त्यांनी आपल्या विरोधकांना कडक इशाराही दिलाय.

 

अखेर खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित, मात्र रक्षा खडसेंचा भाजप सोडण्यास नकार! वाचा ही सविस्तर माहिती

पक्षप्रवेशावेळी एकनाथ खडसे भावूक झाले होते. आता राष्ट्रवादीत आल्यानंतर भाजप इतकच निष्ठेनं काम करेल आणि नाथाभाऊंची ताकद दाखवून देईन असं खडसेंनी म्हंटलंय. 

पाहा खडसे नेमकं काय म्हणाले -

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवारांनी त्यांचं स्वागत केलं. त्यावेळी बोलताना नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळे ताकद वाढेल. खडसेंचा अनुभव हा पक्षासाठी मोलाचा ठरेल असं पवार म्हणालेयत. तर खडसेंच्या प्रवेशामुळे कुणीही नाराज नसून, मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नसल्याचंही पवारांनी सांगितलं.


संबंधित बातम्या

Saam TV Live