खंबाटकीच्या एस कॉर्नरची धास्ती, तिघांवर काळाचा घाला

ओंकार कदम
शुक्रवार, 6 मार्च 2020
  • खंबाटकी घाटात भीषण अपघातात 
  • 3 जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी 
  • ब्लॅक स्पॉट असलेल्या एस कॉर्नरवर ट्रक उलटून अपघात

खंडाळा (जि.सातारा) : पुणे बंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटातील एस.आकाराच्या वळणावर भरधाव वेगात येणारा बोअरवेल ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने व गेअर बॉक्स तुटल्याने ट्रक महामार्गावरच पलटी झाला. या अपघातात छत्तीसगड येथील तिघे जण जागेवरच ठार झाले आहेत. तसेच एकुण दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अतिगंभीर जखमींना सातारामधील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय (सिव्हील हॉस्पिटल) येथे हलविण्यात आले आहे. 

 

हेही वाचा - हा अपघात पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल

 

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, आज (शुक्रवार) सकाळी कुडाळ (ता.जावळी) वरुन खंडाळा येथे बोअरवेल घेण्यासाठी येताना खंबाटकी घाटात हा ट्रक (गाडी क्रमांक एम-एच 11- एएल 4466) पलटी झाला. यावेळी बोअरवेलच्या गाडीतील लोखंडी पाईप या कामगारांच्या अंगावर पडल्याने व तर काही जण गाडी खाली सापडले. यामध्ये दोघे जण जागेवरच ठार झाले तसेच दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींना येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ट्रकच्या केबीनमध्ये अडकल्याने चालक तेलदुराई हा किरकोळ जखमी झाला. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. बोअरवेल पाईप सेवा रस्त्यावर इतरञ पडले होते. पोलीसांनी तत्काळ हटवले व जाखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

 

हेही वाचा- पुढच्या आठवड्यात लग्न होतं, पण त्याआधीच मृत्यून गाठलं

 

हेही वाचा- आता बाईक घेतली तर हेल्मेट फुकट मिळणार?

 

या घटनेचे गांभीर्य पाहता खंडाळ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हणमंतराव गायकवाड, पोलीस सुभाष पोळ, गिरीष भोईटे, विठ्ठल पवार व महामार्ग पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले होते. हे सर्व जखमी छत्तीसगड राज्यातील असल्याने पाेलिसांनाही त्यांची पुर्ण नाव समजले नाहीत. काही जखमींची नावे पुढील प्रमाणे तेलदुराई (चालक),विठ्ठल,तेल्लु कृतुलिंग, मुस्तफा, प्रमोद, राजा, कुन्नास्वामी, व्येकंटेश लक्ष्मण, बाबुलाल, कालीमत व जंगलु हे गंभीर जखमी आहेत. पोलिसांना त्यांच्याबाबत माहिती देण्यास कोणीही उपलब्ध नसल्याने तूर्तास तरी घटनेची नाेंद झालेली नाही.

 

हेही वाचा - आजच्या अर्थसंकल्पात असणार या गोष्टी

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

khambataki accident black spot satara three dead truck tanker


संबंधित बातम्या

Saam TV Live