खंडाळा तालुक्यातल्या हाॅस्पीटलमध्ये आॅक्सिजन बेड; पण यंत्रणाच नादुरुस्त

Khandala Hospital
Khandala Hospital

सातारा - सातारा satara जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची corona patient संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज सातारा जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत तर ३५ पेक्षा जास्त रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन बेड oxygen bed उपलब्ध होत नसल्याने काही रुग्णांना जीवाला मुकावे लागले आहे. अनेक कोविड सेंटर covid patient बाहेर ऑक्सिज बेड मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक धावपळ करताना दिसून येत आहेत.Jagtap Hospital has 54 oxygen beds but the system is not working properly

अशा परिस्थितीत केवळ प्रशासनाच्या गलथान कारभारा मुळे खंडाळा तालुक्यातील  जगताप हॉस्पिटलमध्ये jagtap hospital  ऑक्सिजन बेडची सुविधा असताना देखील ही यंत्रणा नादुरुस्त असल्या कारणाने धूळ खात पडून असल्याचे उघडकीस आले आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे viraj shinde यांनी अचानक या कोविड सेंटर मध्ये स्वतः जाऊन ही धक्कादायक परिस्थिती समोर आणली आहे.

जिल्ह्यात बेड अभावी रुग्ण दगावत असताना खंडाळ्यातील ही ५४ ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू असती तर अनेक रुग्णांना दिलासा मिळाला असता असे विराज शिंदे म्हणाले. या केंद्रात सध्या केवळ लक्षण नसलेले रुग्ण patient दाखल करून  त्यांच्यावर उपचार करण्याचे काम सुरू आहे.या वेळी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी गलथान कारभार करणाऱ्या खंडाळा तालुक्यातील प्रांत आणि तहसीलदार यांना  त्वरीत निलंबित करावे अशी मागणी केली आहे.Jagtap Hospital has oxygen beds but the system is not working properly

Edited by - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com