'किल नरेंद्र मोदी' खळबळ उडवणारा ई-मेल, कोण उठलंय मोदींच्या जीवावर?

साम टीव्ही
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020
  • कोण उठलंय मोदींच्या जीवावर?
  • 'किल नरेंद्र मोदी' खळबळ उडवणारा ई-मेल
  • ई-मेलनंतर सगळ्या यंत्रणा तपासात गुंतल्या

किल नरेंद्र मोदी असा मजकूर असलेला एक ई-मेल थेट राष्ट्रीय तपास यंत्रणेला पाठवण्यात आलाय. त्यामुळे सगळ्या यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवावर नेमकं कोण उठलंय? याचा तपास सुरु झालाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेय. केवळी किल नरेंद्र मोदी असा मजकूर असलेला मेल थेट राष्ट्रीय तपास यंत्रणेला आलाय. ज्यामुळे सगळ्या यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आलाय. रॉ, गुप्तचर यंत्रणा, संरक्षण गुप्तचर यंत्रणा आणि NIA या ई-मेलच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न करतायत.

कोण उठलंय मोदींच्या जीवावर?

  •  ylawani12345@gmail.com या मेल आयडीवरुन हा ई-मेल पाठवण्यात आलाय. 
  • रात्री १ वाजून ३४ मिनिटांनी हा ई-मेल करण्यात आला
  • यात केवळ ३ शब्दच लिहिले आहेत
  • किल नरेंद्र मोदी इतकाच मजूक या मेलमध्ये आहे

काही दिवसांपूर्वीच एका तरुणांनी तासाभरात मोदींना गोळ्या झाडण्याची धमकी दिली होती. या तरुणांला अटकरण्यात आली होती. त्यानंतर लगेचेच हा धक्कादायक ई-मेल येऊन धडकलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीविताला धोका तर नाही ना? या प्रश्नाभोवती वेगाने तपास सुरु झालाय. 

 देश कोरोनाशी लढत असतानाच, NIA कडे आलेल्या या मेलने एक नवं आव्हान सगळ्या यंत्रणांसमोर आणून ठेवलंय. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवावर उठलेल्या दुष्प्रवृत्तींना शोधून काढण्याचं.. आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेचं.


संबंधित बातम्या

Saam TV Live