VIDEO| फळांचा राजा तुमचा खिसा खाली करणार

अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी
शनिवार, 18 जानेवारी 2020

हवामान बदललं की त्याचा पहिला फटका पिकांना सर्वात आधी बसतो. हापूस आंब्याला मुख्यत: हा फटका बसणार आहे. कोकणात सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळतायंत. दरवर्षी डिसेंबर अखेरीस मोहोर येऊन जानेवारीमध्ये फळं झाडाला लागलेली दिसायची. पण यंदा मात्र जानेवारी महिना अर्धा संपला तरी झाडावर फळं दिसत नाहीयेत.

हापूसचे दर हे दरवर्षी चढेच असतात. पण यंदा मात्र त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वातावरणात दिवसागणिक बदल होतं असल्यानं बागायतदार आणि शेतकरी औषध फवारणीवर भर देतायं. किमान आलेला मोहोर तरी नीट टिकावा याकरता प्रयत्न केला जातोय. साहजिकच हापूस उशिरा बाजारात दाखल होणार असल्यानं ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

वातावरणात अचानक गारठा वाढतोय, तर कधी अचानकपणे तापमानात उष्णता वाढतेय. वातावरणाच्या या लहरीपणाचा फटका आंबा पिकाला बसतोय. त्यामुळे एकीकडे हापूस बाजारात यायला उशिर तर होणारच आहे पण त्यासोबतच त्याच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोड हापूस खरेदी करताना ग्राहकांचं तोंड मात्र वाकडं होण्याची शक्यता आहे.

WebTittle::  The King of Fruits will lower your pocket

संबंधित बातम्या

Saam TV Live