तारुण्यात गुडघेदुखी का होते? जाणून घ्या कारणं आणि उपाय

SAAM TV
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

गुडघेदुखी आजार तसा म्हातारपणातला... पण हा आजार आता तिशीतल्या तरुणांनाही होऊ लागलाय. तारुण्यात गुडघेदुखी का होऊ लागली . 

गुडघेदुखी आजार तसा म्हातारपणातला. पण हा आजार आता तिशीतल्या तरुणांनाही होऊ लागलाय. तारुण्यात गुडघेदुखी का होऊ लागली . 

गुडघेदुखीचा आजार तसा वयाच्या साठीतला म्हणजेच म्हातारपणातला. पण हा त्रास आता तरुणांनाही होऊ लागलाय. तिशीतल्या तरुणांमध्ये गुडघेदुखीच्या तक्रारी वाढल्यात. तिशीतल्या ४० टक्के तरुण पुरुष आणि स्त्रियांना गुडघेदुखीचा त्रास होऊ लागलाय. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहाराच्या बदलत्या सवयी, पूर्वी झालेली दुखापत आणि संधीवातासारखे आजार गुडघेदुखीला कारणीभूत आहेत. 

गुडघेदुखी टाळण्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सुचवलेत. स्वतःचं वजन वाढू देऊ नका, अवजड वस्तू उचलणं टाळा, बैठे काम असेल तर अधूनमधून उभं राहून चालत राहा. पौष्टीक आहार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित व्यायाम करा.  असं डॉक्टर सांगतात.

तारुण्यातली गुडघेदुखी ही बदलत्या जीवनशैलीची देणगी आहे. तारुण्यातली गुडघेदुखी टाळण्यासाठी आताच खबरदारी घ्या.

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या बदलत्या सवयींमुळे तिशीपासूनच गुडघेदुखी मागे लागल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुडघेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण ४० टक्के  वाढले असून यामध्ये ३० ते ६० या वयोगटातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

 अनेकदा पूर्वी झालेल्या दुखापती किं वा संधिवातामुळे नागरिकांमध्ये गुडघेदुखीची समस्या उद्भवते. शारीरिक कष्टाची कामे करताना किं वा अति दगदग झाल्यास अशा व्यक्तींना गुडघेदुखीचा त्रास होतो. ज्या रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे, ऑस्टिओआर्थरायटीस किं वा ऑस्टिओटॉमीसारखे त्रास आहेत, त्यांना गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय असतो. व्यस्त जीवनशैली, त्यामुळे बदललेल्या आहार-विहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव यांमुळे गुडघेदुखी ही समस्या तरुणांमध्ये दिसणे हे आता सर्वसाधारण झाले आहे. गुडघेदुखीची समस्या सुरू झाल्यानंतरही तिच्याकडे दुर्लक्ष के ले असता त्यातून बरीच गुंतागुंत निर्माण होऊ शकते. गुडघेदुखीची समस्या टाळण्यासाठी वयाच्या चाळिशीनंतर सर्व प्रकारचे व्यायाम तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करावेत. गुडघेदुखीची सुरुवात झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वयोमान आणि शरीरमानानुसार व्यायामाची निवड करा. गुडघ्यांवर अतिरिक्त भार येणार नाही याची काळजी घ्या.

 वजन वाढू न देणे तसेच जड वजन न उचलणे ही खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. गुडघे प्रत्यारोपणानंतरही सायकल चालवणे, धावणे, पोहणे, नृत्य करणे या बाबी शक्य आहेत, मात्र डॉक्टरांशी चर्चेनंतरच त्या केल्या जाव्यात, असंही डॉक्टर सांगतात


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live