VIDEO | पतीच्या पगाराविषयी महिलांसाठी महत्वाची बातमी, वाचा काय आहे नवीन कायदा

साम टीव्ही
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020
  • जाणून घ्या तुमच्या पतीचा पगार 
  • कायद्यानं घ्या नवऱ्याच्या खिशाचं माप
  • माहिती अधिकारात द्यावी लागणार माहिती

तुम्ही जर महिला असाल आणि तुम्हाला तुमच्या पतीचा पगार माहित नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी यापुढे तुम्हाला पतीचा पगार जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असेल. विशेष म्हणजे महिलांच्या अधिकाराला आता माहिती अधिकाराचं कवचही लाभलंय.

तुमच्या नवऱ्याचा पगार किती असा प्रश्न अनेक महिलांना विचारला तर त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटेल...पगाराच्या दिवशी घरखर्चासाठी दिलेल्या पैशांव्यतिरिक्त आपल्या पतीला नेमका किती पगार आहे याची कल्पनाही नसते. पण आता महिलांना हा कायदेशीर अधिकार मिळालाय. पत्नीला नवऱ्याचा पगार जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असून हा तपशील संबंधित कार्यालयानं द्यायला हवा, असं केंद्रीय माहिती आयोगानं स्पष्ट केलंय.  
जोधपूरच्या रहमत बानो यांनी दाखल केलेल्या अपीलवर हा निर्णय देण्यात आलाय.
पतीच्या एकूण आणि करपात्र उत्पन्नाची माहिती देण्यास नकार दिल्यानं केंद्रीय माहिती आयोगानं जोधपूरच्या प्राप्तिकर विभागाला 15 दिवसांत पतीच्या पगाराची माहिती द्या असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे याच आधारावर आता इतर महिलाही माहिती अधिकारात पतीचा पगार जाणून घेऊ शकतात. मुंबईत सर्वात जास्त पती पत्नीचे वाद असतात त्यामुळे याचा महिलांना फायदा नक्कीच होऊ शकतो.

प्रत्येक पत्नीला आपल्या नवऱ्याच्या पगाराचा नेमका तपशील माहिती असायला हवी. ही माहिती जाणून घेणं हा तिचा अधिकारच आहे, असं माहिती आयुक्त यांनी म्हंटलंय. त्यामुळे आता निश्चिंत व्हा. महिलांनो कायदा तुमच्या पाठिशी आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live