VIDEO | कोल्हापुरात चिकन 50 रुपये किलो

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर  
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मटणाच्या दरांचा रेट कोल्हापुरात नियंत्रणात आला... आणि आता चिकनच्या दराने तर खवय्यांसाठी दिवाळीच केलीए... पण या दिवाळीनं पोल्ट्री व्यावसायिकांचं मात्र दिवाळं निघालंय... कारण इथे चिकन 50 रुपये किलोनं विकलं जातयं... काही ठिकाणी 70 रुपये आहे, पण तेही काही अस्सल खवय्यांसाठी महाग नाहीच... तर अंडीही स्वस्त झाली आहेत... अंड्यांची किंमत दोन रुपयांनी कमी झालीए..

 हे सगळं झालंय ते कोरोनाच्या अफवेमुळे... कोल्हापुरातून गोव्यात चिकनचा सप्लाय होतो.. मात्र तिथे कोरोनोची अफवा पसरली आणि मागणी घटली... त्यामुळे जवळपास दीडशे कोटींचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसलाय... स्वस्ताईमुळे खवय्यांचं फावलंय खरं,तरीही त्यांना कोरोनाची भीती आहेच... पण कोंबड्यांमुळे कोरोनाची लागण होत नाही.. हे लक्षात ठेवा... आणि बिनधास्त चिकन खा... चिकन स्वस्त आहे... आणि पूर्वी इतकंच मस्त आहे... 

WebTittle :: Kolhapur chicken at Rs 50 per kg 

संबंधित बातम्या

Saam TV Live