कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती कोचला आग

अनंत पाताडे
बुधवार, 9 जून 2021

शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग - कोकण रेल्वेच्या Konkan Railway विद्युत दुरुस्ती Electrical repair  गाडीच्या सामान ठेवण्याच्या कोचला Coach आग fire लागल्याची घटना समोर आली आहे. (Konkan Railway electrical repair coach fire)

हे देखील पहा - 

ही आग आज सकाळी साडे नऊच्या सुमारास लागली होती. झाराप स्टेशन जवळ ही आग लागली होती.  

शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ एम आय डी सी , सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथून अग्निशमन दलाला बोलावण्यात आले होते.  

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड ऑन अलर्ट !

आगीवर आता नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या आगीमुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक सुरक्षिततेसाठी काही काळ थांबवण्यात आली होती. त्यानंतर  रेल्वे वाहतूक साडे अकरा वाजता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

 

Edited By - Puja Bonkile 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live