कोपरगावचे भाजप नेते प्रा. सुभाषचंद्र शिंदे यांची आत्महत्या

गोविंद साळुंके
मंगळवार, 27 एप्रिल 2021

भाजपाचे अत्यंत निष्ठावान कोपरगाव शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. सुभाषचंद्र आनंदराव शिंदे ( वय ७५ ) यांनी राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महतेमुळे भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव : भाजपाचे BJP अत्यंत निष्ठावान कोपरगाव Kopargaon शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. सुभाषचंद्र आनंदराव शिंदे ( वय ७५ ) यांनी राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महतेमुळे भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे. Kopargaon BJP Leader Subhaschandra Shinde Commits Suicide

प्रा. शिंदे यांच्या आत्महत्येचे Suicide नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्यांनी सून वर्षा शिंदे यांच्या खबरीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान प्रा. शिंदे यांच्या खिश्यात एक चिट्ठी सापडली आहे.

त्यामध्ये नेमके काय लिहिले आहे, या संदर्भात पोलिसांनी माहिती देण्यास टाळले असून त्यानुसारच पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस Police निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले आहे. प्रा. शिंदे यांचे राज्यभरातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी व्यक्तिश: जवळचे संबंध होते. त्यांच्या आत्महतेमुळे भाजप BJP वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live