2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची कारणं आयोगाकडून तपासली जात आहेत. यावेळी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार आहे.
पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रवादी सर्वसर्वा शरद पवारांना समन्स बजावण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा आयोगाने 4 एप्रिल रोजी राष्ट्रवादी सर्वसर्वा शरद पवारांना हजर राहण्याचे आदेश दिलेत. 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची कारणं आयोगाकडून तपासली जात आहेत. यावेळी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार आहे.
शरद पवारांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
चौकशी आयोग राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरेगाव भीमा प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बोलावणार होतं अखेर या जबाव नोंदवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. शरद पवार यांनी आपल्या वक्तव्यांमध्ये कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणात काही हिंदुत्त्ववाद्यांचा हात आहे असं म्हंटलं होतं. याबाबत बोलताना शरद पवार यांनी काही नावांचा देखील उल्लेख केलेला होता. यामध्ये एकबोटे यांचं देखील त्यांनी नाव घेतलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना याबाबत माहिती असल्यास त्यांचा जबाब नोंदवा असं वक्तव्य केलं होतं.
18 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी कोरेगाव भीमाच्या तपासवरुन पवारांनी निशाणा साधला होता. तसंच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरही त्यांनी थेट हल्लाबोल केला होता. कोरेगाव भीमामध्ये वेगळं वातावरण तयार करण्याचं काम भिडे एकबोटेंनी केलं असल्याचा आरोप पवारांनी केला होता. तसंच एल्गार परिषदेचा आणि कोरेगाव भीमा प्रकऱणाचा काडीचाही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. एल्गार परिषदेशी संबंध नसलेल्यांवरही गुन्हे दाखल कऱण्यावरुन त्यांनी तत्कालीन सरकारवर निशाणा साधलाय.
दरम्यान, केंद्राने केलेल्या तपासातील हस्तक्षेपावरही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. मुख्यमंत्र्यांना तपासाचं पत्र शरद पवारांनी लिहिलं होतं. या पत्रानंतर तातडीने केंद्रानं कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. त्यामुळे स्वतंत्रपणे या प्रकरणाचा तपास कऱण्यासोबत पोलिसांचीही चौकशी केली जावी, अशी मागणीही शरद पवारांनी यावेळी केली होती.
पाहा व्हिडीओ -
पाहा व्हिडीओ -
korogaon bhima violence summons to sharad pawar marathi ncp chief pune