करोनासाठी  केइएममध्ये  प्रयोगशाळा

साम टीव्ही न्यूज
रविवार, 15 मार्च 2020

केइएम रुग्णालयाशी संलग्न असलेल्या प्रयोगशाळेमध्येही ही सुविधा सुरू करणे शक्य होते. मात्र तेथील बंद पडलेल्या नॅशनल प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटर संदर्भात योग्यवेळी ठोस निर्णय न घेतल्यामुळे या लॅबचे काम पूर्ण झाले नाही. पालिका आयुक्तांनी हे काम तातडीने पूर्ण करून सोमवारपासून लॅब सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. करोना विषाणू संसर्गाच्या तपासणीसाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालायमध्ये निदान चाचण्यांची सुविधा सुरू आहे. 

मुंबई : करोना विषाणू संसर्गाच्या तपासणीसाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालायमध्ये निदान चाचण्यांची सुविधा सुरू आहे. पालिका आयुक्तांनी हे काम तातडीने पूर्ण करून सोमवारपासून लॅब सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत सातव्या मजल्यावर करोना तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठीच्या कामाला वेग आला आहे. सोमवारपासून येथे ही व्यवस्था उपलब्ध होणार असून कस्तुरबा रुग्णालयावरील भार कमी होईल.  

हेही वाचा :: कोरोनाने गिळल्या 600 कोटींच्या कोंबड्या

केइएम रुग्णालयाशी संलग्न असलेल्या प्रयोगशाळेमध्येही ही सुविधा सुरू करणे शक्य होते. मात्र तेथील बंद पडलेल्या नॅशनल प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटर संदर्भात योग्यवेळी ठोस निर्णय न घेतल्यामुळे या लॅबचे काम पूर्ण झाले नाही. 

आणखी वाचा ::  इटलीतील मृतांची संख्या आणखी वाढली

 नॅशनल प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटरने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये हे सेंटर कार्यरत नाही, असे स्पष्ट केले होते. तसेच, हे सेंटर दुसऱ्या सरकारी किंवा पालिका रक्तपेढीतून प्लाझ्मा घेऊन विघटनाची प्रक्रिया करते. त्यात मिळालेले अल्बुमिनसारखे प्रोटिन घटक विकून त्यातूनही पैसे मिळवते. पालिका तसेच सरकारी रक्तपेढीमध्ये हे रक्त वा रक्तघटक का विकले जात नाहीत, असाही प्रश्न आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता.

हेही वाचा ::  मोबाईल घेताय तर ही बातमी  वाचाच 

केइएम रुग्णालयामध्ये आता निदान नमुने घेतले जातात व ते पुढे कस्तुरबा रुग्णालयामध्ये पाठवले जातात. सोमवारपासून येथेही करोनासाठी तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
 

WebTittle :: 


संबंधित बातम्या

Saam TV Live