हातावर पोट असणाऱ्या मजुराने सापडलेले ९७ हजार केले परत

साम टिव्ही ब्युरो
रविवार, 25 एप्रिल 2021

शासनाच्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुराला त्याला सापडलेले ९७ हजारांच्या पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल या मजुराने पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिले आहे. रामदास जिचकार असे या मजुराचे नाव आहे..

अमरावती : एखादी अमानवीय घटना घडली की लगेच लोक म्हणतात माणुसकी कुठे आहे? संपली माणुसकी! पण आजही माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना गोष्टी आपण कोरोना काळात अनुभवतोय. माणुसकीचा व प्रामाणिकतेचा परिचय देणारी एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात समोर आली आहे. Laborer from Amravati Returned Unclaimed money to police 

शासनाच्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुराला त्याला सापडलेले ९७ हजारांच्या पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल या मजुराने पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिले आहे. रामदास जिचकार असे या मजुराचे नाव आहे..

अमरावती Amravai जिल्ह्यातील मोर्शी Morshi तालुक्यातील दापोरी येथील रामदास गोमाजी जिचकार हे सामाजिक वनीकरनाच्या कामावर मोलमजुरी करतात. दापोरी ते मायवाडी रस्त्यावरील झाडांना पाणी टाकण्याकरिता लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आणण्याकरिता ते गेले असता त्यांना त्या पाण्यामध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल चिखलामध्ये पडून असल्याचे आढळून आले. Laborer from Amravati Returned Unclaimed money to police 
 
सापडलेल्या एवढ्या मोठ्या रकम पाहून कुणालाही लोभ सुटणे साहजिकच. पण मोलमजुरी करनाऱ्या रामदास यांच्यातील प्रामाणिकपणा जागा झाला. लागलीच त्यांनी तेथील वनपाल एस एस काळे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सदर नोटाचे बंडल घेऊन रामदास यांनी मोर्शी पोलीस स्टेशन Police Station गाठले व घडलेला प्रकार सांगून त्या नोटा पोलिसांत जमा केल्या. यामुळे मजुरी करणाऱ्या रामदास यांनी दाखवलेल्या  प्रामाणिकतेमुळे मोर्शी पोलिसांनी त्यांचा सत्कार केला. 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live