विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावात आरोग्य सुविधांचा अभाव..

ambulance
ambulance

अकोला : चाळीस हजाराच्या वरती लोकसंख्या असलेले आणि विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले अकोला Akola जिल्ह्यातील हिवरखेड गावामधील आरोग्य केंद्रात प्रमुख सुविधांचा अभाव आहे. हिवरखेड Hivarkhed आणि आजूबाजूची गावे अशा जवळपास एक लक्ष लोकांच्या आरोग्याची जबाबदारी असल्यामुळे येथे कमीत कमी ५० रुग्णवाहिकांची नितांत गरज असताना. याउलट पुर्वी असलेली १०८ रुग्णवाहिका सुद्धा कोविडसाठी अकोल्याला पळविले गेले आहेत. Lack of health facilities in Hiravkhed village

त्यामुळे १०८ रुग्णवाहिका Ambulance वेळेवर उपलब्ध होत नसल्याने आतापर्यंत अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी उदाहरणे आहेत. मंजुर पदांपैकी अनेक पदे रिअसूक्त न रात्री मुक्कामी निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना वणवण भटकावे लागत आहे. शासनाने लक्षावधी रुपये खर्चुन  बांधलेले वैद्यकीय अधिकारी निवास शोभेची वस्तू बनले आहे. याठिकाणी कोरोना लसींचा नियमित पुरवठा होत नाही. अनेक पीडितांना आणि आरोपींना वैद्यकीय चाचणीसाठी हिवरखेड पोलीस Police येथे घेऊन येत असतात.

परंतु त्यांना आल्या पावली परत जावे लागते. कारण येथे एमबीबीएस MBBS दर्जाचे डॉक्टर नसल्याने पोलिसांनाही आरोपी व पीडितांना सोबत घेऊन अकोट, तेल्हारा, अडगाव इत्यादी ठिकाणी घेऊन जावे लागते. आरोग्य केंद्रात रिक्त पदांची यादी लांब आहे. परंतु विविध फलकांवर मान्यवरांच्या नावाची भरमार आहे. येथे एकूण नावे व पदांचे ४ फलक लावलेले असून त्यावर जवळपास ८३ नावे व पदाची नोंद आहे. पण संबंधित मान्यवरांचे, लोकप्रतिनिधींचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, मोबाईल नंबर कोठेही लिहिलेली नाहीत. Lack of health facilities in Hiravkhed village

इतकी नावे असताना त्यातील काहींचे जरी संपर्क क्रमांक नमूद केलेले असते, तर रूग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल. आपत्कालीन परिस्थितीत गंभीर रुग्णांचे जीव वाचवता येतील, अशी समस्या महत्त्वाच्या बैठकीत मांडणाऱ्या जागरूक पत्रकाराला एका लोकप्रतिनिधीने मुजोरी करीत, मोठ्याने जोराच्या आवाजात दबावतंत्राचा वापर करत, अरेरावीच्या शब्दात, धमकवण्याचा आणि सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रकार हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये घडला आहे.

१९ एप्रिल रोजी कोरोना संदर्भात उपाययोजना, नियोजन, आणि महत्त्वाच्या चर्चेसाठी अकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तेल्हारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर,  सहाय्यक गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे,  विस्तार अधिकारी सतीश सरोदे, सरपंच सौ सीमा संतोष राऊत, उपसरपंच रमेश दुतोंडे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर, आणि अनेक लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांची हिवरखेडचे व्यापारी आणि पत्रकार बांधवांसोबत बैठक पार पडली आहे.

सदर बैठकीत एका पत्रकाराने आरोग्यावर चर्चा सुरु असताना वरील मुद्दे उपस्थित करून अधिकाऱ्यांना माहिती देत असताना एका लोकप्रतिनिधीचे पित्त खवळले, आणि सदर लोकप्रतिनिधीने सर्व उच्चस्तरीय अधिकारी, पोलीस आणि सर्व व्यापारी बांधवांसमोर पत्रकारावर दबावतंत्राचा वापर करीत सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. उपरोक्त प्रकार काही अपवाद वगळता सर्वजण लाचारीने बघत होते. त्यामुळे "लोकप्रतिनिधी मुजोर, अधिकारी लाचार.. लोकशाहीला आणि आरोग्य व्यवस्थेला नाही उरला आधार.." अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. Lack of health facilities in Hiravkhed village

हिवरखेड येथील आरोग्यविषयक मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. सोबतच कोव्हीड रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. असे उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com