अबब! पावणेदोन लाखांचे दागिने रेल्वे फलाटावर पडून होते

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 12 मार्च 2020

एक्‍स्प्रेस आल्यानंतर गाडीत बसण्याच्या गडबडीत एक प्रवासी आपली दागिन्यांची बॅग फलाटावर विसरले. बॅग विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.आणि मग...

नाशिक : एखादी वस्तू रस्त्यावर पडलेली पाहिली तर आपण ती उचलत नाही पण जर सोन्याची वस्तू दिसली की प्रत्येकाचं लक्ष त्याठिकाणी जातं.पण नाशिकमध्ये वेगळाच प्रकार घडला. नाशिक रोडला रेल्वेस्थानकावर मंगळवारी (ता.10) फलाट एकवर विसरलेली एक लाख 71 हजारांचा ऐवज असलेली बॅग रेल्वे पोलिसांनी सुखरूप संबंधितांच्या हातात सोपवली. 

नेमकं काय घडलं त्याठिकाणी ?
नाशिक जेल रोड भागातील रहिवासी दत्तात्रय येनपुरे (वय 66) मंगळवारी (ता.10) मनमाडला जाण्यासाठी रेल्वे फलाटावर गोदावरी एक्‍स्प्रेसची वाट पाहात होते. एक्‍स्प्रेस आल्यानंतर गाडीत बसण्याच्या गडबडीत ते त्यांची दागिन्यांची बॅग फलाटावर विसरले. बॅग विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

हेही वाचा- https://www.esakal.com/desh/505-gold-coins-found-near-jambukeswarar-temple-tamil-nadu-265977

पोलिसांनी बॅगेचा शोध घेत हवालदार संतोष उफाडे, पोलिस शिपाई महेश सावंत, आरपीएफ विजय जाधव, कैलास बोडके, गोपनीय विभागाचे सचिन सानप आदींनी शोधाशोध करीत सीसीटीव्हीद्वारे माग काढीत बॅग पुन्हा सायंकाळी येनपुरे यांच्या ताब्यात दिली. बॅगेत 19.98 ग्रॅमची सोन्याची चेन, 9.780 ग्रॅम सोन्याच्या पुतळ्या, 9.970 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 4.550 ग्रॅमचे सोन्याचे मणी, असा सुमारे 4 तोळे 451 ग्रॅमचा सुमारे एक लाख 72 हजारांचा ऐवज परत मिळवून दिला. प्रभारी अधिकारी अशोक जाधव यांच्या उपस्थितीत येनपुरे कुटुंबाला ती बॅग देण्यात आली. 

lWEB TITLE- acs of jewelery on railway tracks!


संबंधित बातम्या

Saam TV Live