मुंबईत पोलिस शिपायाकडून महिला पोलिसावर बलात्कार

सूरज सावंत
रविवार, 30 मे 2021

महिलांच्या सुरक्षेसाठी Women Security कठोर पावले उचलल्याचा दावा देशातील सर्वच राज्य सरकारे करत असतात. पण सर्वसामान्य महिलांचे रक्षण करणाऱ्या महिला पोलीस Police शिपाईवर बलात्काराची Rape घटना घडली आहे

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी Women Security कठोर पावले उचलल्याचा दावा देशातील सर्वच राज्य सरकारे करत असतात. पण सर्वसामान्य महिलांचे रक्षण करणाऱ्या महिला पोलीस Police शिपाईवर बलात्काराची Rape घटना घडली आहे.Lady Constable raped in Mumbai by Male Colleague 

मुंबईच्या घाटकोपर Ghatkopar पोलिस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली आहे. एका पोलिस शिपाईने लग्न करण्याचे आमीष दाखवून  महिला पोलिस शिपाईवर अत्याचार करत लग्नास नकार देत फसवणूक केली.या आरोपी पोलिस शिपाईचे पहिले लग्न झाले असून त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे पीडित महिला पोलिस शिपाईला सांगितले होते.

हे देखिल पहा

माञ लग्नासाठी आरोपी  शिपाई टाळाटाळ करत असल्याने पिडीत महिलेने पोलिसातच तक्रार नोंदवली आहे. २०१८ मध्ये हे दोघं मुंबई पोलिस आयुक्तालयात एकञ कार्यरत असताना दोघांची ओळख झाली होती. घाटकोपर पोलिसांनी पीडित महिला पोलीस शिपाईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

सिडको अध्यक्षपदासाठी माजी आमदार सुरेश लाड यांचे नाव चर्चेत

दरम्यान, आणखी एका प्रकरणात २८ वर्षीय मॉडेलवर बलात्काराप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मी टू प्रकरणात बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांवर आरोप झाले असताना आता अंधेरीत राहणा-या २८  वर्षीय मॉडेलने बलात्काराची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. Lady Constable raped in Mumbai by Male Colleague 

तक्रारीनंतर बांद्रा पोलिसांनी नऊ जणांविरोधात बलात्कार, विनय़भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये प्रसिद्ध निर्मात्याचा पुत्र व अभिनेता, बॉलीवूड टॅलेंट मॅनेजर, प्रसिद्ध छायाचित्रकार, चित्रपट निर्मात्यांचा समावेश आहे.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live