'या अभिनेत्रीला' शेवटची अंघोळ कधी केली हे आठवत नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 डिसेंबर 2019

 या अभिनेत्रीनं चक्क ट्विट करत अंघोळ न करण्याबाबत खुलासा केला आहे. ट्विटमध्ये ती म्हणते, तिला दररोज अंघोळ करायला आवडत नाही. सिनेमा किंवा गाण्यामळे नाही तर लेडी गागा अंघोळीच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. 

 

मुंबई : फेमस अभिनेत्री आणि सिंगर लेडी गागाला रोज आंघोळ करायला आवडत नाही. इतकेच नाही तर तिने शेवटची आंघोळ केव्हा केली आहे, हेही तिला आठवत नाही. खुद्द तिनेच याची कबुली चक्क सोशल मीडियावरच देऊन टाकली आहे. 

सेलिब्रेटी म्हटलं की कामाचा व्याप हा आलाच. अनेकदा या सेलिब्रेटींना त्यांच्या पर्सनल लाइफसाठीही वेळ मिळत नाही. तर अनेकदा त्यांनी काही आठवडे न झोपताही काढावे लागतात. पण हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण कधीच दिसत नाही. लेडी गागाने आपल्या आंघाेळीबाबत जगजाहीर खुलासा केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Wearing @tiffanyandco  #GRAMMYs

A post shared by Lady Gaga (@ladygaga) on

 
 
 

लेडी गागानं ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे. ट्विटमध्ये ती म्हणते, तिला दररोज अंघोळ करायला आवडत नाही. सिनेमा किंवा गाण्यामळे नाही तर लेडी गागा अंघोळीच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. लेडी गागा आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, मला माझ्या एका सहकाऱ्यानं विचारलं होतं की, तू शेवटची अंघोळ कधी केली होतीस तुला आठवतं का? या प्रश्नावर मला आठवत नाही असं उत्तर मी दिलं. असं ट्विट लेडी गागानं केलं आहे.

 

सध्या लेडी गागाचं हे ट्विट सोशलवर चर्चेत आहे. सध्या हे ट्विट व्हायरल होताना दिसत आहे. हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.तिचं हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

लेडी गागाच्या ट्विटचं तिचे चाहते खूप कौतुकही करत आहेत तर दुसरीकडे लोकांना असं वाटत आहे की तिनं अलिकडे रिलीज केलेला तिचा 6 वा अल्बम याच कारणानं लवकर लॉन्च झाला. ती कामात एवढी बीझी होती की तिला स्वतःसाठी फार कमी वेळ मिळाला असेल असं तिच्या काही चाहत्यांचं म्हणणं आहे.

लेडी गागाबद्दल बोलायचं तर ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. अत्रंगी ड्रेस आणि त्यांना कॅरी करण्याचा लेडी गागाचा आत्मविश्वास तिला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करतो. ती एक अप्रतिम गायिका आणि कंपोजर आहे. याशिवाय तिनं अभिनय क्षेत्रातही धमाकेदार पदार्पण केलं आहे. 

Web Title: lady gaga cant remember when she took a bath last time


संबंधित बातम्या

Saam TV Live