काश्मीरमधील दुरध्वनी सेवा सुरळीत,इंटरनेट,मोबाईलवर बंदी 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

  काश्मीरमधील परिस्थिती निवऴत असताना बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा आणि खासगी दूरध्वनीसेवा, मोबाइल सेवा आणि इंटरनेट सेवाही तूर्त बंद राहील. काश्मीर खोऱ्याच्या बहुतांश भागांतील र्निबध हटविण्यात आले आहेत, मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दले तैनात राहणार आहेत.  दूरसंचार र्निबध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याचे आणि बहुतांश ठिकाणच्या दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. परंतु बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा, खासगी दूरध्वनी, मोबाइल आणि इंटरनेट सेवा मात्र बंद आहेत.

काश्मीर खोऱ्यात शनिवारी कुठेही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे दूरसंचार माध्यमांवरील र्निबध शिथिल करण्यात आले. अनेक भागांतील दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. श्रीनगरसह आणखी काही दूरध्वनी केंद्रे शनिवारी सायंकाळी सुरळीत सुरू झाली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. काही मोजके भाग वगळता इतर ठिकाणची दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तथापि, लाल चौक हा व्यापारी भाग आणि येथील प्रेस एन्क्लेव्ह या ठिकाणच्या दूरध्वनी सेवा तूर्त बंद राहतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

काश्मीरचा ध्वज उतरवला

जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर तीन आठवडय़ांनी जम्मू-काश्मीरचा ध्वज उतरवण्यात आला. अनुच्छेद ३७०नुसार, जम्मू- काश्मीरला आपला स्वतंत्र ध्वज ठेवण्याची परवानगी  होती. लाल रंगाच्या या ध्वजावर पांढऱ्या रंगाच्या तीन उभ्या रेषा आणि पांढऱ्या रंगाचा एक नांगर होता.भारताच्या राष्ट्रध्वजासह फडकणारा जम्मू- काश्मीरचा ध्वज रविवारी तेथील सचिवालयावरून उतरवण्यात आला. 

WebTittle : Landline Services Restored In Kashmir Mpg 94

संबंधित बातम्या

Saam TV Live