कोकणात पुन्हा दरड कोसळली 

कोकणात पुन्हा दरड कोसळली 


वैभववाडी (सिंधुदुर्ग) : भुईबावडा घाटातील दरड हटविण्याचे काम सुरू असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी दरड कोसळल्यामुळे दरडी हटविण्याच्या कामात व्यत्यय येत आहे. दोन जेसीबींच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आज, सायंकाळी उशिरापर्यंत हा मार्ग वाहतुकीस खुला होईल, असा अंदाज बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.

बुधवारी (४ सप्टेंबर) पहाटे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात दरड कोसळली होती. दगड मातीचा मोठा भराव रस्यावर आल्याने पूर्ण रस्ता व्यापला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान बांधकाम विभागाने बुधवारी सकाळी  वाजल्यापासून दोन जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याच्या कामास सुरूवात केली होती. मात्र, घाट परिसरात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे त्यामुळे डोंगरातील दगड कोसळण्याचे प्रकार यामुळे दरड हटविण्याच्या कामात व्यत्यय येत आहे. काल सांयकांळी उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते. काळोख झाल्यानतंर हे काम थांबविण्यात आले.

आज सकाळपासून पुन्हा दरड हटविण्याच्या कामाला सुरूवात केली. दरड हटविण्याचे काम सुरू असताना सतत दगड माती कोसळत आहे. त्यामुळे दरड हटविण्याचे काम अतिशय काळजीपूर्वक करावे लागत आहे. बांधकामचे दोन तीन कर्मचारी फक्त डोंगराकडे लक्ष ठेवून आहेत. दरडीचा भाग मोठा असल्यामुळे आज सायकांळी उशिरापर्यंत हा मार्ग वाहतुकीस खुला होण्याचा अंदाज बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.


Web Title: landslides in bhuibawada gaganbawda kharepatan road konkan
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com