सातारा जिल्ह्यात लसीकरणासाठी मोठ्या संख्येने गर्दी...

ओंकार कदम
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वाढता आकडा हा चिंतेचा विषय बनला आहे. परंतु प्रशासनाला लसीकरणाच्या जागरूक करण्याच्या  बाबतीत मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

सातारा : राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना Corona बाधितांचा वाढता आकडा हा चिंतेचा विषय बनला आहे. प्रशासनाला Administration नागरिकांना लसीकरणसाठी जागरूक करण्याच्या  बाबतीत मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लस घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात लोकांच्या रांगा लागल्या आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात तब्बल  ५ लाख ९७ हजार ३२० जणांनी लस घेतली आहे. Large crowds for vaccination in Satara district

लसीकरण झाल्यानंतर कोरोना बाधित होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यात फ्रंटलाईन वर्कर सोडले, तर त्या प्रमाणात आणखी घट आहे. शिवाय लसीकरणानंतर बाधित झालेल्या रुग्णांमध्ये अत्यवस्थ असलेल्यांची संख्या सुद्धा कमी प्रमाणात आहे.

सध्या तरी लसीचा पुरवठा थोड्या प्रमाणात होत आहे.  परंतु भविष्यात जेव्हा पुरवठा सुरळीत होईल, तेव्हा लोकांनी स्वतः हुन पुढे येऊन मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये Aniruddha Athalye यांनी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live