दिलासादायक! गेल्या २४ तासात राज्यात ७१ हजार ७३६ रूग्ण करोनामुक्त, सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुण्यातील

साम टिव्ही ब्युरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

गेल्या २४ तासात राज्यात ७१ हजार ७३६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुण्यातील आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.   

सध्या महाराष्ट्रात Maharashtra कोरोना Corona विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसोबतच आता मृतांच्या आकडेवारीतही मोठ्या प्रमाणातही वाढ होत. असे असले तर एक दिलासादायक बातमी Good news समोर आली आहे. गेल्या २४ तासात राज्यात ७१ हजार ७३६ रूग्ण करोनामुक्त Corona freeझाले आहेत. त्यात सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुण्यातील Pune आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिली.    In the last 24 hours, 71 thousand 736 patients are corona free

याशिवाय गेल्या २४ तासात राज्यात ४८ हजार ७०० नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर ५२४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू Death झाला आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे. सध्या राज्यात ३९,७८,४२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ७९९ इतकी आहे. In the last 24 hours, 71 thousand 736 patients are corona free

राज्यात डॉक्टर्स Doctor, नर्स Nurse यांच्या प्रयत्नांमुळे रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. त्यामुळे दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात मोठी वाढ होत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही देखील मोठ्या प्रमाणत वाढली आहे. दरम्यान,राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे कोरनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.   

Edited By - Shivani Tichkule

 


संबंधित बातम्या

Saam TV Live