अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 मे 2020

शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलीय. UGC ला पत्र लिहून त्यांनी ही मागणी केलीय.

मुंबई विद्यापीठाच्या पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या किंवा अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत.

 तसेच अंतिम वर्षांच्या अंतिम सत्रासाठी प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांच्या, एटीकेटीच्या परीक्षा यासुद्धा जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाने परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना महाविद्यालयांना दिल्यात. या परीक्षा 13 मार्चपर्यंत शिकवलेल्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येतील. टाळेबंदीचा कालावधी हा विद्यार्थ्यांचा उपस्थिती कालावधी म्हणून ग्राह्य़ धरण्यात येणार आहे.

 दरम्यान, शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलीय. UGC ला पत्र लिहून त्यांनी ही मागणी केलीय. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहाता, शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा न घेण्याला UGC ने परवानगी द्यावी, अशी मागणी उदय सामंतांनी केलीय


संबंधित बातम्या

Saam TV Live