अखेर अंतिम वर्षाच्या परिक्षांचा गोंधळ निवळला, परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसूनच देता येणार असल्याची माहिती

साम टीव्ही
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

या अहवालातील शिफारसींच्या आधारे परिक्षांचं नियोजन करून 7 सप्टेंबरपर्यंत परीक्षेचं वेळापत्रक सरकारकडे पाठवण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आलेत. त्यामुळे विद्यापीठनिहाय परिक्षांच्या तारखा 7 सप्टेंबरला जाहिर होण्याची शक्यता आहे.

अंतिम वर्षांच्या परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसूनच देता येतील, अशी महत्वाची शिफारस कुलगुरूंच्या समितीने केलीय. कुलगुरुंच्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलाय. या समितीने सरकारला परीक्षांच्या आयोजनाबाबत 11 शिफारसी केल्यात. कोरोनामुळे हा निर्णय कित्येक दिवसांपासून अडकला आहे. आता हा अहवाल आता सर्व विद्यापीठांना पाठवण्यात येणार आहे. या अहवालातील शिफारसींच्या आधारे परिक्षांचं नियोजन करून 7 सप्टेंबरपर्यंत परीक्षेचं वेळापत्रक सरकारकडे पाठवण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आलेत. त्यामुळे विद्यापीठनिहाय परिक्षांच्या तारखा 7 सप्टेंबरला जाहिर होण्याची शक्यता आहे.

पाहा, सविस्तर व्हिडिओ, परिक्षा नेमक्या कशा आणि कधी असतील?


संबंधित बातम्या

Saam TV Live