उषा खन्ना यांना मंगेशकर पुरस्कार जाहीर 

उषा खन्ना यांना मंगेशकर पुरस्कार जाहीर 


मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने सन 2019 - 20 साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली.

उषा खन्ना यांचा जन्म 7 ऑक्‍टोबर 1941 रोजी झाला. भारतीय चित्रपट सृष्टीतील मोजक्‍या महिला संगीतकारांपैकी त्या आहेत. 'दिल देके देखो'' या 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून त्यांनी संगीत दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर बिन फेरे हम तेरे, लाल बंगला, सबक, हवस, हम हिंदुस्थानी, आप तो ऐसे ना थे, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, अनोखा बंधन, शबनम, सौतन, आओ प्यार करे यांसारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्यांनी अनेक नवीन गायकांना गाण्याची संधी दिली. त्यांनी काही मालिकांसाठीही संगीत दिग्दर्शन केले. "दिल परदेसी हो गया' हा 2003 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट.


Web Title: Lata Mangeshkar Award Give to Usha Khanna

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com