लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पावसाची तुफान बॅटिंग

लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पावसाची तुफान बॅटिंग


औरंगाबाद -  मराठवाड्यात परतीच्या पावसाने जोर धरला असून, रविवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने सोमवारपर्यंत मुक्काम ठोकल्याने लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत दाणादाणा उडाली. लातूर जिल्ह्यात तर पहिल्यांदाच मोठा पाऊस झाला, तोही परतीचा. अन्य जिल्ह्यांतही पावसाने तुफान बॅटिंग केली. नदी-नाल्यांना पूर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. काही धरणे, तलावांना संजीवनी मिळाली. सोनबीनला मात्र मोठा फटका बसला आहे.

लातूर जिल्ह्यात रविवारी (ता. २०) रात्रीपासून सोमवारी सकाळी आठपर्यंत या वर्षीच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस झाला. चोवीस तासांत सरासरी ६१.७१ मिलिमीटर पाऊस झाला. उदगीर, अहमदपूर व जळकोट तालुक्‍यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तब्बल १६ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १९९ मिलिमीटर पाऊस घोणसी (ता. जळकोट) मंडळात झाला. काही ठिकाणी नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली.

उस्मानाबाद - जिल्ह्यात काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत सर्वदूर पाऊस झाला. ४२ पैकी बारा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सर्वाधिक १२० मिलिमीटर पाऊस तुळजापूर तालुक्‍यातील सलगरा (दिवटी) मंडळात नोंदला गेला. नळदुर्ग येथील बोरी धरण ओसंडू लागले आहे. 

नांदेड : जिल्ह्यात मुखेड व कंधार तालुक्‍यासह तेरा मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ५६३.१० मिलिमीटरनुसार सरासरी ३५.१९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

परभणी - जिल्ह्यात दोन दिवसांत ६५.५३ मिलिमीटर पाऊस झाला. पूर्णा तालुक्‍यातील चुडावा मंडळात अतिवृष्टी झाली. दुधना, पूर्णा नद्या भरून वाहत आहेत.

Web Title: Latur district big rainfall for the first time

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com