संघर्षमय प्रवासातून उद्योगपती बनलेल्या बापलेकांचा कोरोनाने केला घात ! 

दीपक क्षीरसागर
रविवार, 18 एप्रिल 2021

व्यापारात लांबचा पल्ला गाठलेले लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लामजना येथील संजय शंकर कुंभार कोरोनामुळे गुरुवारी लातुरच्या खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. लगेच शनिवारी  मुलगा अनिल संजय कुंभार याचेही कोरोनाने खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. 

लातूर: अतिशय खडतर संघर्षमय प्रवासातून छोट्या सायकल दुरुस्ती करणारे व्यवसायीक ते मोठा वीटभट्टी उद्योजक असा यांचा जीवनाचा प्रवास होता. व्यापारात लांबचा पल्ला गाठलेले लातुर Latur जिल्ह्यातील औसा Ausa तालुक्यातील लामजना Lamjana येथील संजय शंकर कुंभार ( वय ४९ ) यांचे गुरुवारी ( ता. १५ ) कोरोनामुळे Corona लातुरच्या खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. Latur Father and son both died due to Corona

एवढे कमी कि काय देवाने या कुटुंबावर दुसरा घाला घातला. लगेच शनिवारी ( ता. १७ ) मुलगा अनिल संजय कुंभार ( वय २९ ) याचेही कोरोनाने खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. 

अतिशय खडतर दिवस काढून कुटुंबाची धुरा सांभाळत उद्योगाला गती देणारे दोन्ही बाप लोक आज आपल्यातून निघून गेल्याने औसा तालुक्यातील लामजना गावावर शोककळा पसरली आहे. बाप लेकाच्या मृत्यूची दुःखद घटना गावासाठी मन हेलावणारी ठरली आहे.

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना लातुर येथील खडगाव Khadgaon स्मशानभूमीत काल २७ तर परवा २२ अशा दोन दिवसात 49 मयत नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दुःखद बाब अशी की मयत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य देखील अंत्यसंस्कार करताना सोडून जात आहेत.

लातुर जिल्ह्यात कोरोनाचा महाभयंकर विस्फोट झालेला पाहायला मिळत असून दीड हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. महानगरपालिका Municipal Corporation  कर्मचारी इमानी इतबारे या सर्व मयतावर अंत्यसंस्कार करत आहेत. नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी करत आहेत. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live