CORONA RETURNS | मुंबई लोकलमुळे कोरोना पसरतोय? प्रवाशांचा बेजबाबदारपणा भोवणार...

साम टीव्ही
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

आठवड्याभरापासून मुंबईतली कोरोना रुग्णसंख्या वाढू लागलीय. या रुग्णवाढीला मुंबईत सुरू झालेली लोकल सेवा कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद करावी अशी मागणी होतेय.

आठवड्याभरापासून मुंबईतली कोरोना रुग्णसंख्या वाढू लागलीय. या रुग्णवाढीला मुंबईत सुरू झालेली लोकल सेवा कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद करावी अशी मागणी होतेय.

सर्वसामान्यांसाठी मुंबईतली रेल्वेसेवा सुरू झाल्याने रेल्वेतील गर्दी वाढलीय. मात्र त्यामुळे मुंबईतल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून आलंय. रुग्ण संख्या वाढल्यास रेल्वे प्रवाशांवर निर्बंध आणण्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिलेत. 

मुंबईत 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासाची मुभा दिलीय. 1 फेब्रुवारीला दिवसभरात मुंबईत 328 नवे रुग्ण आढळले होते तर 10 फेब्रुवारीला दिवसभरात मुंबईत 558 नवे रुग्ण सापडले होते. लोकल सेवा सुरू झाल्यापासून मुंबईच्या रुग्णसंख्येत 4 हजार 237 नव्या रुग्णांची वाढ झालीय. मात्र रुग्णसंख्या वाढली तरीही सुदैवाने मुंबईत मृत्यूचा वेग घटलाय. गेल्या आठवड्यापर्यंत 7 ते 8 ही दैनंदिन मृत्यूची संख्या घटून 3 ते 4 पर्यंत खाली आलीय. 

1 फेब्रुवारीला रुग्ण दुपटीचा कालावधी 564 दिवसांवर गेला होता. मात्र गेल्या आठवड्याभरात रुग्ण दुपटीच्या कालावधीत 9 दिवसांची घट झाली असून 10 फेब्रुवारी रोजी तो 555 दिवसांवर आलाय. 

तरीही रेल्वेतली गर्दी वाढतेय. सीएसएमटी, दादर,कुर्ला, किंवा चर्चगेटसारख्या स्थानकांवर कोरोनापूर्व काळात व्हायची तशीच गर्दी होऊ लागलीय. त्यामुळे नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा परततोय की काय अशी भीती निर्माण झालीय.


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live