लावणीसम्राटला मिळाली चित्रपटाची ऑफर

साम टीव्ही
रविवार, 14 मार्च 2021

लावणी सम्राटाला चित्रपटात संधी
दिलखेचक नृत्यानंतर आता अभिनयाचा आविष्कार
साम टीव्हीच्या बातमीचा अनोखा परीणाम

 

 

 

 

वाजले की बारा गाण्याने राज्यातील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेल्या बारामतीच्या बाबजी कांबळे या रिक्षा चालकाला आता मराठी चित्रपटाची ऑफर आलीय. साम टीव्हीच्या बातमीमुळे या कलाकाराला चंदेरी दुनियेचे दरवाजे खुले झालेत. 

बाबजी कांबळे यांची ही लावणी साम टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. एखाद्या लावणी साम्राज्ञीला हेवा वाटेल अशा या अदांची घराघरात चर्चा झाली. त्यामुळे बाबाजी कांबळेंच्या या अप्रतिम नृत्याची चित्रपट सृष्टीतून दखल घेतली गेली नसती तर नवलच..बातमी पाहून 'अलख निरंजन' तसंच 'एलिजाबेथ एकादशी' अशा काही चित्रपटांचे निर्माते असलेल्या घनश्याम येडे यांनी बाबजी कांबळेंना संपर्क साधला. 

एवढच नव्हे तर घनश्याम येडे हे बाबाजींना भेटण्यासाठी खास बारामतीत आले. कांबळेंचं कौतुक करत त्यांनी थेट आपल्या दोन आगामी चित्रपटात भूमिका देण्याची इच्छा व्यक्त केलीय. 

त्यामुळे आपल्या पदलालित्याने रसिकांना घायाळ करणारा हा अवलिया कलाकार अभिनयाच्या क्षेत्रातही तितकीच दमदार मजल मारेल ही अपेक्षा.


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live