वकिलाने खंडिणीसाठी केले आपल्याच क्लायंटचे अपहरण

Crime
Crime

नवी मुंबई: नवी मुंबईत Navi Mumbai आपल्याच क्लायंट असलेल्या शिपिंग कंपनीच्या मालकाकडून 3 करोडची 3 Crores खंडणीची Ransom मागणी वकिलाने केली. मात्र पैसे देण्यास नकार दिला म्हणून फिर्यादीचे नवी मुंबईतून अपहरण Kidnapping करण्यात आले.The lawyer kidnapped his own client for ransom

परंतु अपहृत व्यक्तीच्या चतुराईने आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे फिर्यादीची सुटका झाली. आरोपी विमल झा विरोधात खारघर Kharghar पोलिसांनी Police अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गाडीचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती:
आरोपी विमल झा याने त्या क्लायंटच्या डोळ्यावर एक पट्टी बांधली. आणि 3 वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी नेऊन त्याला मारहाण केली.  ज्या गाडीतून अपहरण करण्यात आले त्या गाडीचे टोल नाक्यावरील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. याचा मागोवा घेऊन विमल झा याला खारघर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सध्या तळोजा कारागृहात Taloja Jail विमल झा याची रवानगी करण्यात आलेली आहे. 

फार्म हाऊस वर नेऊन केली मारहाण:
पहिल्यांदा कर्जत नंतर कल्याण रोड मार्गे मुरबाड आणि त्यानंतर माळशेज घाट गाठत आळे फाटा मार्गे नाशिक Nashik ला एका फार्म हाऊसवर Farm House बंद खोलीत ठेवले होते. यावेळी वारंवार पैश्यांचा तगादा लावत डोक्यात जबर मारहाण करण्यात आली. तसेच पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला गेला. जो पर्यंत पैसे देत नाही तो पर्यंत 3 ते 4 दिवस एकाच ठिकाणी डांबण्याचा त्यांचा प्लॅन होता. नाशिकच्या बिग बझार मध्ये खरेदी करत असताना बिग बझार च्या एका कामगाराच्या मोबाईल वरून फिर्यादीने नजर चुकवून पत्नीस कॉल केला होता. त्या नंबर वरून तो कॉल तो ट्रेस केला गेला असता पोलिसांना नाशिक येथील लोकेशन सापडले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे फिर्यादीपर्यंत पोहण्याचा मार्ग मिळत गेला. The lawyer kidnapped his own client for ransom

आरोपीच्या साथीदार फरार पोलिसांचा तपास सुरू:
आरोपी वकील विमल झा यांच्या प्लॅन मध्ये सहभागी असलेले चार साथीदार सध्या फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. नवी मुंबईतून अपहरण करताना आरोपी सह 3 आणखी साथीदार होते.  आणि त्या नंतर नाशिकमध्ये आणखी एका साथीदार त्यांच्यासोबत सामील झाला. पैसे घेऊन आपल्याला ठार करण्याच्या Murder विचारात हे सारे जण होते असे फिर्यादीने सांगितले आहे.

खोटी तक्रार करून अडकवण्याची दिली होती धमकी: 
शिपिंग कंपनीचा मालक आणि वकील विमल झा या दोघांचा संपर्क गेल्या वर्षी पासून होता. वकिलाने माझी सगळी कडे ओळख असून तुमच्या कंपनीचे सगळे काम मी करून देतो असे आश्वासन देत काम दिले. परंतु काम न करून सुद्धा वकील त्याला परत परत भेटण्यास भाग पाडत असे. त्यामुळे जेव्हा शिपिंग कंपनीच्या मालकाने पुढील कोणताही व्यवहार करण्यास नकार दिला तेव्हापासून  वकील विमल झा त्याच्या मागावर होता. The lawyer kidnapped his own client for ransom

व्यवहार नाकारण्याचा बदला घेण्यासाठी वकिलाने त्याच्या स्वतःच्या अशिलाच्या मागे माणसे लावून तो कुठे आणि कसा जातो याची नोंद केली. आणि  त्याला धमकावू लागला की,  "आता तुला मी अडकवणार आणि खोटी कंप्लेंट करून फसवणार".  जेव्हा अशिलाने ह्या धमकी ला बळी न पडता आपले सगळे संबंध तोडून टाकण्याचे प्रयत्न केले तेव्हा ह्या वकिलाने हे असे कृत्य करून  आपल्या क्लायंटलाच जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Edited By-Sanika Gade
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com