सांगलीत बिबट्याचा थरार; राजवाडा चौकात सकाळी दिसला बिबट्या

साम ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

सांगलीच्या राजवाडा चौका आज सकाळी बिबट्या दिसल्याने चांगलीच खळबळ उडाली. या परिसरात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर या बिबट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे

सांगली:  सांगलीच्या राजवाडा चौका आज सकाळी बिबट्या दिसल्याने चांगलीच खळबळ उडाली. त्यामुळे या परिसरात पोलिसांकडून (Police) संचारबंदी लागू करण्यात आली. तर या बिबट्याला (Leapord) पकडण्यासाठी पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. या बिबट्याला पाहण्यासाठी राजवाडा चौकात लोकांची तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. Leaopard Sneaked in Sangli City Busy Area

सांगलीतील बिबट्याला पकडण्यासाठी कोल्हापूर (Kolhapur) येथून रेस्क्यू टीम मागवण्यात आली आहे. तसेच बिबट्याला बेशुद्ध करणाऱ्या गन्स देखील कोल्हापूर हुन सांगलीत दाखल झाल्या आहेत, अशी माहिती वन (Forest) अधिकारी प्रमोद धानके यांनी दिली आहे. सांगलीच्या राजवाडा आणि बी एस एन एल च्या पाठीमागे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.. 

सांगली (Sangli) शहरात नागरी वस्तीत राजवाडा चौकात स्थानिकांना बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहरात या बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. 'नागरिकांनी घराबाहेर फिरताना दक्षता घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

Edited By-Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live