कौशल्य विकासचे अभ्यासक्रम आखा : उद्धव ठाकरे 

सरकारनामा
बुधवार, 22 जानेवारी 2020

मुंबई : राज्यात येणारे खासगी, सार्वजनिक प्रकल्प, नवनवीन उद्योग यांना ज्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ लागते आणि त्याची माहिती घेऊन तसेच रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन त्याप्रमाणे कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी विभागाची आणि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली, त्या वेळी ते बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रमांचे जिल्हानिहाय नियोजन करणे गरजेचे आहे. त्या त्या भागातील गरजा, तेथील उद्योग, लघुउद्योग, उत्पादनसाधने आदींची माहिती घेऊन त्या अनुषंगाने अभ्यासक्रमांची आखणी होणे गरजेचे आहे. राज्यात अनेक खासगी, सार्वजनिक, शासकीय असे मोठ-मोठे प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांसाठी आवश्‍यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची माहिती घेऊन तसे अभ्यासक्रम आखावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. 

कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक म्हणाले की, राज्यात कुशल रोजगार निर्माण करण्यात कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान आहे. आयटीआयच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार मिळाला आहे. 

 WebTittle::  Learn about skill development courses: Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live