रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लिंबू झाले महाग; मागणी वाढल्याने भावात वाढ

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 20 एप्रिल 2021

कोरोनाच्या काळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘क’ जीवनसत्वचे पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जात आहे. परिणामी ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असलेल्या लिंबूचे सेवन करण्याकडे लोकांचा कल आता वाढत चालला आहे.

ठाणे : कोरोनाच्या Corona काळात शरीरातील रोगप्रतिकारक Immunity Sustem शक्ती वाढवण्यासाठी ‘क’ जीवनसत्वचे Vitamin C पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जात आहे. परिणामी ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असलेल्या लिंबूचे सेवन करण्याकडे लोकांचा कल आता वाढत चालला आहे. Lemons became expensive

त्यातच उन्हाचे प्रमाण वाढत चालल्यामुळे सरबतासाठीही लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे उत्तम प्रतीच्या लिंबांचा भाव प्रति नग दहा रुपयांवर गेला आहे. एकीकडे लिंबाची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे कमी उत्पादनामुळे लिंबांची आवक घटली.  यामुळे लिंबांच्या किमतीत वाढ होत आहे असे बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सोलापूर Solapur, अहमदनगर Ahamadnagar, बीड Beed, कर्नाटक Karnatak आणि आंध्र प्रदेश Andhra Pradesh तसेच ठाणे Thane, मुंबई Mumbai आणि नवी मुंबई Navi Mumbai शहरांमध्ये अनेक भागातून लिंबांची आवक Inward होत असते. उन्हाळ्याच्या काळात लिंबांची सर्वत्र मागणी वाढते. मात्र आवक कमी प्रमाणात होत असते. त्यामुळे परिणामी त्याच्या दरातही वाढ होते. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक जण काळजी घेत आहेत. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन आहाराकडेही लक्ष देत आहेत. 

त्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिक ‘क’  जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असलेल्या लिंबूचे सेवन करीत आहेत. आधीच उन्हाळ्यात लिंबूची मागणी वाढली असतानाच कोरोना काळात लिंबूचे महत्व वाढले असल्यामुळे लिंबांना मोठी मागणी येऊ लागली आहे. लिंबाची आवक आणि मागणीत तफावत होऊ लागल्याने लिंबांचे दर प्रति नग दहा रुपयांपर्यंत पोहचले आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live