पाहूयात...पूजा चव्हाण प्रकरणाचा घटनाक्रम नेमका कसा आहे...

SAAM TV
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

6 फेब्रुवारीच्या रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून पूजाने उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली.

6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी पूजाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय.

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू.

पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली.

एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे मंत्री संजय राठोड यांचं नाव चर्चेत.

13 फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला आयोगानं पूजा चव्हाण प्रकरणाच्या तपासाचा अहवाल पाठवण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना दिले.

15 फेब्रुवारीला नातेवाईक आणि मित्रांचे जबाब घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक पूजाच्या मूळगावी रवाना

कुणीही तक्रार न दिल्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी 11 दिवसांनी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.

पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

23 फेब्रुवारीला अनेक दिवस नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड कुटुंबासह पोहरादेवीत दाखल झाले.

पोलिस तपास करत आहेत पण, माझ्याबद्दल आणि समाजाबद्दल घाणेरडं राजकारण झाल्याचा आरोप संजय राठोड यांनी केला.
 
24 फेब्रुवारीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला संजय राठोडांनी हजेरी लावली.

संजय राठोड वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले, दीड तास झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी न बोलता संजय राठोड बाहेर पडले.
 
दरम्यान, आजही पूजा चव्हाणची आत्महत्या की हत्या हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live