लेटरबॉम्बमुळं सरकार कोसळणार, सरकारवर का आहे टांगती तलवार ?

साम टीव्ही
सोमवार, 22 मार्च 2021

लेटरबॉम्बमुळं सरकार कोसळणार?
लुटीचं सरकार असल्याचा विरोधकांचा आरोप
सरकारला धोका नसल्याचा पवारांचा निर्वाळा

 

 

 

 

होमगार्डचे पोलिस महासंचालक परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुखांवरच भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याची चर्चा सुरु झालीय. पण पवारांनी सरकारला कसलाही धोका नसल्याचं सांगितलंय

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांमुळं अडचणीत आलंय. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार लुटीचं सरकार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केलाय.

गृहमंत्री अनिल देशमुखांची राष्ट्रवादीकडू पाठराखण, पुढे काय होणार?

 शरद पवारांनी मात्र सरकारची पाठराखण केलीय. सरकारच्या स्थिरतेवर या प्रकरणामुळं फरक पडणार नाही असं त्यांनी स्पष्टपणं सांगितलंय.

 पवार जरी दावा करीत असले तरी परमबीरसिंहांच्या पत्राची एक प्रत राज्यपालांकडं गेलीय. शिवाय राज्यातले भाजप नेतेही केंद्रीय गृहमंत्रालयाकडं तक्रार करणार आहेत. दुसरीकडं काँग्रेसची भूमिकाही अजून स्पष्ट झालेली नाही. त्यामुळं सरकार स्थिर आहे हा पवारांचा दावा थोडासा धाडसाचा म्हणावा लागेल.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live