VIDEO | धौलीगंगाच्या पातळीत वाढ झाली निसर्गाचा हाहाकार, पाहा निसर्गाच्या रौद्ररुपाची ही भयंकर दृष्य

साम टीव्ही
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021
  • उत्तराखंडमध्ये जोशी मठाजवळ हिमकडा कोसळला
  • धौलीगंगाच्या पातळीत वाढ झाल्यानं हाहाकार
  • हिमस्खलनामुळे धरण फुटलं,  अनेकजण बेपत्ता

हिमस्खलनाच्या घटनेनं उत्तराखंड हादरून गेलाय. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळल्याची घटना घडलीय.त्यानंतर झालेल्या प्रलयात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. 

ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ सकाळी ही भयंकर घटना घडली. चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळला आणि अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

हिमकडा कोसळल्यानं धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालंय.त्यावर कहर म्हणजे इथलं धरण फुटल्यानं धौलीगंगेच्या पाणीपातळी प्रचंड वाढ झालीय. अचानक पूर आल्यानं नदीकाठावरील घरांना याचा तडाखा बसलाय.या दृश्यांमधून निसर्गाचं तांडव किती भयानक होतं याची आपल्याला कल्पना येईल. 

हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा बसलाय.  हिमकडा कोसळल्यानंतर ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त झालाय. या ठिकाणी काम करणारे जवळपास 100 ते 150 मजूर दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत. यातील, तपोवन धरणात अडकलेल्या 16 जणांना सुखरुप बचावण्यात बचाव पथकला आलय. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.  
 

या दुर्घटनेत शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीय. राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी तातडीनं दुर्घटनाग्रस्त रेणी गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांकडून जनतेला धैर्य राखण्याचं आवाहन केलंय. दुर्घटनेचं स्वरूप मोठं असल्यानं मदतकार्यात अडथळे येतायेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live