Financial Deadline In September : फक्त 13 दिवस उरले; 30 सप्टेंबरपूर्वी महत्त्वाची 5 कामे पूर्ण करा, अन्यथा मोठं नुकसान होईल

End Of 30th September : सप्टेंबरमध्ये पाच कामांची मुदत संपत आहे. ही कामे पूर्ण न केल्यास तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
Financial Deadline In September
Financial Deadline In SeptemberSaam Tv

Financial Deadline :

आपण आता सप्टेंबर महिन्याच्या मिडमध्ये आहोत. आणि हा महिना आर्थिक मुदतीसाठी खास आहे. या महिन्यात तुमच्यासाठी काही महत्त्वाची कामे आहेत जी 30 सप्टेंबरपूर्वी वेळेवर पूर्ण करणे आवश्यक आहे. हे काम न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. येथे 30 सप्टेंबर 2023 रोजी होणार्‍या 5 बदलांबद्दल माहिती पाहूयात -

स्मॉल सेव्हिंग स्कीमसाठी आधार जमा करणे

जर तुम्ही करंट अकाऊंटधारक असाल तर तुम्ही 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधार (Adhaar Card) क्रमांक देणे आवश्यक आहे, अन्यथा 1 ऑक्टोबर 2023 रोजी तुमचे खाते निलंबित केले जाईल. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किंवा इतर पोस्ट ऑफिस योजनांसारख्या स्मॉल सेव्हिंग स्कीमसाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक पोस्ट ऑफिस किंवा त्यांच्या बँकेला द्यावा लागेल.

Financial Deadline In September
Financial Planning : गुतंवणूकीसाठी 50-20-30 चा रुल फॉलो करा, पैशांची अडचण कधीच भासणार नाही

SBI Special FD

ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI च्या WeCare स्पेशल FD मध्ये गुंतवणूक (Investment) करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, या योजनेसाठी फक्त ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत. या योजनेत एफडीवर जास्त व्याजदर देण्यात आले आहेत.

बँक सामान्य लोकांसाठी कार्ड रेटवर 50 बेसिस पॉइंट्स (bps) चा अतिरिक्त प्रीमियम ऑफर करते. तसेच SBI WeCare स्कीम 7.50% व्याज दर देते. ही योजना नवीन ठेवींसाठी तसेच मुदतपूर्ती ठेवींच्या मॅच्युर होणारी रिन्युअलसाठी उपलब्ध आहे.

IDBI अमृत महोत्सव FD

IDBI बँकेकडून 375 दिवसांच्या अमृत महोत्सव एफडी योजनेअंतर्गत, बँक सामान्य, NRE आणि NRO ला 7.10% व्याज दर देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी, बँक 7.60% ऑफर करते. बँक 444 दिवसांसाठी या योजनेंतर्गत सामान्य नागरिकांना 7.15% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.65% व्याज दर देते. या अंतर्गत गुंतवणुकीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.

डिमॅट, म्युच्युअल फंड मध्ये नॉमिनेशन

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने ट्रेडिंग (Trending) आणि डीमॅट खातेधारकांसाठी नॉमिनेशन किंवा नोंदणीतून बाहेर पडण्याची तारीख वाढवली होती. आता ही अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 आहे. त्यामुळे तुमचे काम पेंडिंग असेल तर ते लवकर पूर्ण करा.

2,000 रुपये बदलण्याचा शेवटचा दिवस

2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ठेवीदार आणि एक्सचेंजर्सना चार महिन्यांची मुदत दिली होती. 30 सप्टेंबरपर्यंत बँकमध्ये नोटा बदलून किंवा जमा कराव्या लागतील. हे काम तुम्हाला अजून पूर्ण करता आले नसेल तर ते वेळेत पूर्ण करा.

Financial Deadline In September
Financial Influencers: सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणाऱ्यांची खैर नाही; फायनान्शियल इन्फ्लुएनर्संवर सेबी लावणार लगाम

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com