5G Network: तुमचा फोन देखील 5G आहे का ? तर तुम्हालाही मिळू शकतो 'हा' प्लान

भारतात सध्या 5G नेटवर्कची बरीच चर्चा सुरु आहे. ऑक्टोबर २०२२ पासून भारतील काही मुख्य शहरांमध्ये 5G नेटवर्कची सुविधा देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे.
5G Network
5G Network Saam Tv

मुंबई: बदलेल्या जीवनशैलीनुसार व तंत्रज्ञानानुसार जगभरात अनेक बदल झाले. साध्या मोबाईलपासून ते नवनवीन टेक्नालॉजीचे फोन उपलब्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात. फोन ही सध्या मानवाच्या काळाची गरज बनली आहे. त्यातच सध्या 5G ही सेवा सर्वत्र उपलब्ध झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे.

भारतात सध्या 5G नेटवर्कची बरीच चर्चा सुरु आहे. ऑक्टोबर २०२२ पासून भारतील काही मुख्य शहरांमध्ये 5G नेटवर्कची सुविधा देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. सध्या बरेच मोबाईल युजर्स विचारात आहेत की, आपले मोबाईल्स 5G नेटवर्कमध्ये का येऊ शकत नाहीत? सध्या बऱ्याच मोबाईल कंपनीने अलिकडेच भारतात 5G नेटवर्क आणण्याची तयारी करत आहेत. (5G Network)

5G Network
Health Issue : सकाळच्या वेळी सतत वाजणारा अलार्म ठरु शकतो, आरोग्यास हानिकारक !

भारतात जरी ऑक्टोबर २०२२ पासून 5G नेटवर्क सुरु झाले असले तरीही मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांना १ वर्षापासून मोबाईलमध्ये 5G नेटवर्क देत आहेत. त्यामुळे बऱ्याच मोबाईल ग्राहकांसाठी 5G नेटवर्क वापरणे खूप सोपे झाले आहे. भारतात Xiaomi या कंपनीने मे 2020 ते जून 2022 पर्यंत ७ दशलक्ष 5G नेटवर्क मोबाईल ग्राहकांसाठी पाठवले होते. हे काही मोबाईल 5G नेटवर्कसाठी वापरले जातीलच असे नाही.

5G Network
Eye Makeup: डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुमच्या मेकअप किटमध्ये 'या' गोष्टीचा समावेश करा

याचा अर्थ असा की, 5G नेटवर्कला आपल्या मोबाईलला कनेक्ट होण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरची गरज असते. पण मोबाईल निर्मात्या कंपनीला नेटवर्कसोबत जोडण्यासाठी सॉफ्टवेअर मिळणे खूप गरजेचे आहे. कदाचित आपल्याला ठाऊक असेल की, खराब मोबाईल नेटवर्क असलेल्या मोबाईलची बॅटरी पटापट संपते. याचे मुख्य कारण असे की, मोबाईल नेटवर्कच्या शोधात राहण्यासाठी किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा जोडण्यासाठी निर्मिती करण्यात आली आहे.

5G Network
Sextortion: Sextortion चं जाळं कुणीतरी टाकतंय... त्यापासून कसं वाचाल?

जेव्हा आपल्या मोबाईलला नेटवर्क उपलब्ध नसेल तेव्हा, 5G नेटवर्क चालू केल्यावर बॅटरी लवकर संपते असे ग्राहकांचे म्हणणे आहे. मोबाईल कंपन्यांनी काही मोबाईलमध्ये ही सेटिंग बंद केली आहे. याला 'सॉफ्टवेअर लॉक' असे म्हटले जाते. जे आपल्या मोबईल मधला ५जी नेटवर्क शोधू शकतात आणि फक्त 4G नेटवर्कशी जोडण्यासाठी सांगितले जाते. म्हणूनच आयफोनच्या कनेव्हिक्टीची सेटिंग्ज सध्या फक्त 3G आणि LTE दाखवतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com