
वृत्तसंस्था: काल झालेल्या घसरणीनंतर आज शेअर मार्केटमध्ये तेजीचे संकेत मिळत आहेत. शेअर मार्केटची (Share Market) सुरुवात गॅप अप ओपनिंगने झाली आहे. बाजारात मार्केट (Share Market) खरेदीचे संकेत दिसून येत आहे. आज सेन्सेक्स (Sensex) ६०० अंकानी वधारत ५६, २६९.९१ अंकावर सुरू झाला. निफ्टी निर्देशांकदेखील १ % वधारला आहे. निफ्टी १७७ अंकानी वधारत १६,८५४.७५ अंकावर सुरू झाला. (Share Market News Updates)
हे देखील पाहा-
निफ्टी ५० मधील ४५ स्टॉकचे शेअर भाव वधारले आहेत. तर, ५ स्टॉकच्या दरात घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टी जवळपास ४०० अंकानी वधारला असून ३५६५५ अंकावर व्यवहार करत आहे. आज आयटी, बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील मार्केटमध्ये तेजी दिसून आली आहे. मेटल आणि वित्तीय क्षेत्रात मार्केट भावात चांगली खरेदी सुरू असल्याचे चित्र आहे. मीडिया शेअर मध्ये घसरण सुरू आहे.
हिरोमोटोकॉर्प शेअर भावात ३.५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ओएनजीसीमध्ये २.९९ टक्के आणि टेक महिंद्राच्या शेअर भावात २.५६ टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटा स्टीलमध्ये २.४६ टक्के, इन्फोसिसमध्ये २.०५ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. निफ्टीमधील टाटा कंसोर्शियमध्ये २.६० टक्क्यांची घट दिसून येत आहे. नेस्लेमध्ये ०.८४ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. टायटनच्या शेअर भावात ०.६१ टक्क्यांनी घसरला आहे. अपोलो हॉस्पिटल आणि एनटीपीसीच्या शेअर भावात घसरण सुरू आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.