डोळ्यांना लावलेले आयलाइनर काढण्यासाठी काही टिप्स

सण-समारंभापासून ते लग्नकार्यापर्यंत आपण डोळ्यांना अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयन्त करत असतो.
How to remove eyeliner in Marathi, eyeliner tips in Marathi, beauty tips in Marathi
How to remove eyeliner in Marathi, eyeliner tips in Marathi, beauty tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपले डोळे (Eye) सुंदर दिसण्यासाठी आपण त्यावर अनेक रंगरंगोटी करत असतो. ते जितके सुंदर असतात तितकेच ते बोलके देखील असतात. सण-समारंभापासून ते लग्नकार्यापर्यंत आपण डोळ्यांना अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयन्त करत असतो. (Beauty tips in Marathi)

हे देखील पहा -

डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्याचे काम आय लायनर करत असते पण तितकेच ते काढणे सोपे नसते. बाजारात नवनवीन ब्रँडचे लायनर मिळतात परंतु, कधीकधी पाण्याने स्वच्छ करूनही लायनर निघत नाही अशावेळी आपण काय करायला हवे तर आयलायनर काढण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत तसेच, आयलायनर काढण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया.

१. गुलाब पाणी -

त्वचा सुधारण्यासाठी आपण गुलाब पाण्याचा (Water) वापर करतो परंतु, हे पाणी डोळ्यांवर लावलेले आय लाइनर स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी कॉटन बॉलमध्ये गुलाबपाणी घालून हलक्या हाताने डोळे स्वच्छ करा. काही वेळातच डोळ्यांवरील आय लाइनर सहज काढता येईल.

How to remove eyeliner in Marathi, eyeliner tips in Marathi, beauty tips in Marathi
धार्मिक कार्यात वापरल्या जाणाऱ्या पानाचे फायदे असेही !

२. मेकअप रिमूव्हर -

लाइनर काढण्यासाठी आपण मेकअप रिमूव्हर देखील वापरू शकतो. तसेच बाजारात अनेक चांगले ब्रँडचे मेकअप रिमूव्हर्स उपलब्ध आहेत. परंतु, डोळ्यांसाठी मेकअप रिमूव्हर घेतल्याने डोळ्यांना जळजळ होऊ शकते. त्यामुळे लाइनर काढताना खूप काळजी (Care) घेणे आवश्यक आहे.

३. नारळ तेल -

त्वचेच्या काळजीसाठी आपण खोबऱ्याच्या तेलाचा वापर करतो. त्वचा आणि केस निरोगी ठेवणारे खोबरेल तेल डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी डोळ्यांना लावलेल्या आय लायनरच्या भागावर तेल लावून टिश्यू पेपरने स्वच्छ करा.

४. कोल्ड क्रीम -

आपल्याकडे आय लायनर काढण्यासाठी कोल्ड क्रीम देखील चांगला पर्याय आहे. यासाठी पापण्यांवर कोल्ड क्रीम लावून कॉटन बॉलने स्वच्छ करु शकतो.

५. होममेड मेकअप रिमूव्हर

आय लाइनर व्यतिरिक्त सर्व मेकअप काढण्यासाठी आपण घरी मेकअप रिमूव्हर सहज तयार करू शकतो. यासाठी कच्च्या दुधात बदामाचे तेल मिसळून पापण्याभोवती लावावे व कापसाच्या बॉलने हलक्या हाताने स्वच्छ केल्यावर आय लाइनर निघण्यास मदत होईल.

अशाप्रकारे आपण सहज व सोप्या पध्दतीने आयलाइनर काढू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com