विक्रमगडमध्ये आढळला सापासारखा दिसणारा दुर्मिळ प्रजातीचा 'देवगांडूळ'...

सर्प मित्र पार्थ पटेल यांनी नीट निरीक्षण केल्यानंतर हा मांडूळ नसून उभयचर जीव (सिसिलिअन) ग्रामीण भाषेत देवगांडूळ असल्याचे त्यांनी सांगितले.
विक्रमगडमध्ये आढळला सापासारखा दिसणारा दुर्मिळ प्रजातीचा 'देवगांडूळ'...
विक्रमगडमध्ये आढळला सापासारखा दिसणारा दुर्मिळ प्रजातीचा 'देवगांडूळ'...रुपेश पाटील

पालघर: विक्रमगड येथील एन. डी. वाडेकर यांच्या घराजवळ देवगांडूळ (सिसिलिअन) हा दुर्मिळ प्रजातीचा उभयचर जीव आढळून आला आहे. सापसारखा दिसणारा हा जीव या परिसरात आढळून आला. विक्रमगड येथील सर्प मित्र पार्थ पटेल यांना लोकांनी कळवताच घटनास्थळी धाव घेत प्रथम दर्शनी हा मांडूळ असल्याचा लोकांना अंदाज होता. परंतु सर्प मित्र पार्थ पटेल यांनी नीट निरीक्षण केल्यानंतर हा मांडूळ नसून उभयचर जीव (सिसिलिअन) ग्रामीण भाषेत देवगांडूळ असल्याचे त्यांनी सांगितले. (A rare snake-like species 'Devgandul' found in Vikramgad)

हे देखील पहा -

या देव गांडूळाला सुरक्षित स्थळी सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाय नसल्यामुळे आणि निमुळत्या लांब शरीरामुळे प्रथदर्शनी तो सापा सारखा वाटतो. ते आपला बहुतेक जीवनकाळ ओलसर जमिनीच्या खाली घालवतात त्यामुळे ते आपल्याला खूप कमी परिचित आहेत. ते अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये आढळून येतात. त्यांच्या आहारात प्रामुख्याने गांडूळाचा समावेश होतो. या जाती पूर्णपणे पायविहरीत असतात. त्यांच्या लहान प्रजाती गांडूळासारख्या आणि मोठ्या प्रजाती ५ फुटापर्यंत लांब आणि सापा सारख्या वाटतात. त्यांची त्वचा गुळगुळीत आणि प्रामुख्याने गडद पण काही प्रजातीमध्ये रंगीबेरंगी त्वचा दिसून येते. स्वतःला वाचवण्यासाठी साठी ते त्वचेमधून विषारी द्रव्य सोडतात. त्वचेमधून निघणाऱ्या द्रव्यात Siphonops paulensis नावाच्या द्रव्याचा समावेश असतो.

विक्रमगडमध्ये आढळला सापासारखा दिसणारा दुर्मिळ प्रजातीचा 'देवगांडूळ'...
Cyber Crime: मुंबई सायबर विभागाचा ई-मेल आयडी हॅक

वावीरची दृष्टी फक्त अंधारात बघण्यासाठी विकसित झालेली असते आणि ते आपला बहुतेक जीवनकाळ जमिनीखाली घालवतात. त्यांची डोक्याची कवटी आणि टोकदार तोंडाचा भाग चिखलातून वाट काढायला वापरतो. त्याच्या शरीराचे स्नायू चिखलातून वाट काढण्याच्या दृष्टीने विकसित झालेले आहेत. सर्व सिसिलियन प्रजाती डोळे आणि नासिकामध्ये असलेल्या संवेदनाग्र (antenna) चा वापर संवेदनेसाठी करतात. सगळ्या सिसिलियन प्रजातीमध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी फुफुसे असतात पण त्याचबरोबर ते त्वचा आणि तोंडाचा वापर सुदधा करतात. त्यांचं डाव फुफुस उजव्या फुफुसापेक्षा खूपच लहान असते, असे अनुकूलन सापांमध्ये सुदधा दिसून येत असल्याचे सांगितले.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.