Healthy Recipe : चविष्ट पण आरोग्यदायी अशी हेल्दी डिश, पाहा रेसिपी

Recipe For Health : पनीर आणि पनीरची कोणतीही रेसिपी सगळ्यांना आवडते.
Healthy Recipe
Healthy RecipeSaam Tv

Healthy Recipe For Health : पनीर आणि पनीरची कोणतीही रेसिपी सगळ्यांना आवडते. अशातच पनीर हे दुग्धजन्य पदार्थ आहे. त्यामुळे पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असते. जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते.

ब्रोकली पनीर रेसिपी ही एक शाकाहारी डिश असून, चवीला अतिशय उत्कृष्ट आहे. ही रेसिपी बनवणार अत्यंत सोपे आहे. सोबतच तुम्ही ही रेसिपी स्नॅक्स म्हणून ट्राय करू शकता. ब्रोकली ही एक फ्लावर सारखी दिसणारी भाजी आहे.

Healthy Recipe
Healthy Diet Tips : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

या भाजीचा रंग हिरवा असून नवीन अतिशय लागते. तुमच्या घरी (Home) पाहुणे आल्यावर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या स्वादिष्ट ब्रोकली पनीरची रेसिपी.

ब्रोकली पनीरची सामग्री -

दोन कप ब्रोकली, तीन मोठे चमचे लोणी, बारीक चिरलेला एक मोठा कांदा (Onion), एक मोठा चमचा अद्रक पीसलेले, अर्धा चमचा काळीमिरी पूड, दोन कप क्यूब पनीर, एक मोठा चमचा तीळ, एक मोठा चमचा किमा बनवलेला लसूण, मीठ चवीनुसार, एक छोटा चमचा काळे तीळ.

Healthy Recipe
Papai Halwa Recipe : आरोग्यासाठी उत्तम आहे पपईचा हलवा, जाणून घ्या रेसिपी आणि फायदे

ब्रोकली पनीर कसे बनवावे -

ब्रोकली का ब्लांच करा -

ब्रोकलीला अर्ध्या देठापर्यंत कापा आणि त्यांना ब्लांच करा. त्यांना तेवढा वेळ ब्लांच करा जोपर्यंत त्या नरम न पडता पहिल्याच वेळी थोड्या कुरकुरीत होतील.

पनीर शिजवा -

एका नॉनस्टिक पॅनमध्ये लोणी टाकून पॅन मध्यम फ्लेमवर ठेवा. त्यानंतर पनीरचे तुकडे पॅनमध्ये घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता. त्यानंतर हे पनीरचे तुकडे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा.

सामग्री परता -

ज्या प्यानमध्ये तुम्ही पनीर शेलोफ्राय केले होते, त्याच पॅनमध्ये आणखीन थोडे लोणी घालून सफेद तीळ, काळे तीळ टाका. त्यानंतर जिरे तडकावून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लसूण, आणि अद्रक टाका. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता.

ब्रोकली आणि पनीर टाका -

सर्वात शेवटी पॅनमध्ये ब्रोकली, पनीर, मीठ, काळीमिरी पूड घालून पाच ते दहा मिनिटं चांगल्या प्रकारे परतून घ्या. तयार आहे तुमची स्वादिष्ट पनीर ब्रोकली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com