
Vangani News : आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला थकवा, डोळ्यांना खाज येणे, डोळे कोरडे पडणे, अंधुक दिसणे व सतत डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, अशा अनेक डोळ्यांचा आजार आपण पाहीले आहेत. परंतू अंध व्यक्तींच्या रोजगारासाठी ब्रेल लिपीचा वापर होतो.
एक काळ असा होता जेव्हा अंध लोक लिहिता-वाचण्याची कल्पनाही करू शकत नाहीत, परंतु लुई ब्रेल यांनी अगदी लहान वयात एक लिपी तयार केली ज्याच्या मदतीने अंध लोक देखील लिहू आणि वाचू शकतात.
लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त वांगणीत दृष्टीहीनांसाठी आरोग्य शिबिर आयोजन -
दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपीचा शोध लावणारे फ्रेंच शास्त्रज्ञ लुई ब्रेल यांच्या २१३ व्या जयंतीनिमित्त वांगणीत अंध नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. वांगणीतील साई सेवा हॉस्पिटलच्या वतीनं या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.
वांगणीत मोठ्या संख्येनं अंध नागरिक वास्तव्याला आहेत. या अंध नागरिकांसाठी साई सेवा हॉस्पिटल आणि नॅशनल फेडरेशन ऑफ व्हिज्युअल इम्पेअर्ड पर्सन या संस्थेच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होते.
या शिबिरात अंध बांधवांची संपूर्ण आरोग्य चाचणी करण्यात आली. तसंच डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शन करत औषधं सुद्धा दिली. यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या तब्बल २०० अंध नागरिकांना साई सेवा हॉस्पिटलच्या वतीने दृष्टी कार्डचं वाटप करण्यात आलं. या कार्डच्या सहाय्याने या अंध नागरिकांवर वर्षभर अल्पदरात उपचार केले जाणार आहेत.
साई सेवा हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सतीश भोईर आणि नितीन कांबळे यांच्या पुढाकाराने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती साई सेवा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक उत्तम पालांडे यांनी दिली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.