Air India : एअर इंडियाचा प्रवास होणार अधिक सुरक्षित, जीई एयरोस्पेससोबत केला करार !

Air India And GE Aerospace deal : डीलमध्‍ये ४० जीईएनएक्‍स इंजिन्‍स, २० जीई९एक्‍स इंजिन्‍ससाठी फर्म ऑर्डर, तसेच सर्विसेसचा समावेश
Air India
Air IndiaSaam Tv

GE Aerospace : एअर इंडिया या टाटा सन्‍सचा भाग असलेल्‍या कंपनीने ४० जीईएनएक्‍स-१बी आणि २० जीई९एक्‍स इंजिन्‍स, तसेच बहुवार्षिक ट्रचॉईस इंजिन सर्विसेस करारासाठी फर्म ऑर्डरवर स्‍वाक्षरी केली आहे.

२० बोईंग ७८७ आणि १० बोइंग ७७७एक्‍स विमानासाठी विमानसेवेच्‍या फर्म ऑर्डरसह समन्‍वयाने या करारावर स्‍वाक्षरी करण्‍यात आली.

टाटा ग्रुप व एअर इंडियामध्‍ये आम्‍हा सर्वांना जीई एरोस्‍पेससोबत हा सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे, जेथे आम्‍ही एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमानसेवा बनवण्यासोबत सर्वात तंत्रज्ञान-प्रगत विमानसेवा बनवू, असे टाटा सन्‍स व एअर इंडियाचे अध्‍यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन म्‍हणाले.

Air India
Travel Tips : यंदाच्या सुट्टीत पार्टनरला फिरायला घेऊन जायचे आहे ? मग फुकटात फिरा Hong Kong, जाणून घ्या कसे

आम्‍हाला टाटा (Tata) ग्रुप व एअर इंडियासोबतची आमची दीर्घकालीन भागीदारी सुरू ठेवण्याचा अभिमान वाटतो, असे जीईचे ज्‍युनिअर अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि जीई एरोस्‍पेसचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी एच. लॉरेन्‍स कल्‍प म्‍हणाले. आम्ही एअर इंडियाच्‍या ताफ्यामध्‍ये हे इंजिन्‍स सादर करण्‍याप्रती सहयोगाने काम करण्‍यास खूप उत्‍सुक आहोत आणि ते अपवादात्‍मक कामगिरी देण्‍याची खात्री घेण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.

जीई एरोस्‍पसेने १९८२ पासून एअर इंडियाला (Air India) पाठिंबा दिला आहे, त्‍यावेळी विमानसेवेने त्‍यांच्‍या पहिल्‍या सीएफ६-पॉवर्ड एअरबस ए३०० ची डिलिव्‍हरी घेतली होती. विमानसेवा सध्‍या १५० हून अधिक विमानांच्‍या ताफ्याचे कार्यसंचालन पाहते, ज्यामध्ये जीई९०-पॉवर्ड बोईंग ७७७एस आणि जीईएनएक्‍स-पॉवर्ड बोईंग ७८७एस यांचा समावेश आहे.

Air India
Honeymoon Travel Place : हनीमूनसाठी बेस्ट ठरतील महाराष्ट्रातील 'ही' 5 पर्यटनस्थळे, जाणून घ्या

कसे असणार

एअर इंडियाने ८०० पेक्षा जास्त लीप इंजिन्‍ससाठी सीएफएम ऑर्डरची देखील घोषणा केली, जी आतापर्यंतची सर्वात मोठी लीप ऑर्डर आहे, ज्यामुळे २१० एअरबस ए३२०/ए३२१निओ विमाने आणि १९० बोईंग ७३७ मॅक्‍स-फॅमिली विमानांची (Aeroplan) संपूर्ण खरेदी (Shopping) करता येईल. या घोषणेमध्ये बहु-वर्षीय सीएफएम सेवा कराराचा समावेश आहे. सीएफएम हा जीई आणि सॅफ्रॅन एअरक्राफ्ट इंजिन यांच्‍यामधील ५०/५० चा संयुक्त व्यवसाय आहे.

जीई एरोस्पेस इंजिन्‍ससाठी ही ऑर्डर आमच्या Vihaan.AI परिवर्तन योजनेला समर्थन देते, ज्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आमचा ताफा आणि जागतिक नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात विस्‍तार करण्‍याचा आहे, असे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले. आम्हाला विश्‍वास आहे की, हे इंजिन्‍स आम्हाला आवश्यक असलेली विश्वासार्हता व कार्यक्षमता प्रदान करतील आणि आम्‍हाला जीईसोबतच्‍या आमच्‍या दीर्घकालीन संबंधाला कायम ठेवण्‍याचा आनंद होत आहे.

Air India
Travelling With Kids : लहान मुलांसोबत फिरायला जाताय ? 'हे' पदार्थ अवश्य सोबत ठेवा

गेल्‍या दशकामध्‍ये आम्‍ही लक्षणीयरित्‍या अधिक इंधन कार्यक्षम, आवाजरहित कार्यरत व कमी कार्बन डायऑक्‍साईड उत्‍सर्जन करणाऱ्या व्‍यावसायिक इंजिन्‍सचा नवीन पोर्टफोलिओ सादर केला आहे, असे जीई एरोस्‍पेससाठी कमर्शियल इंजिन्‍स अॅण्‍ड सर्विसेसचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी रसेल स्‍टोक्‍स म्‍हणाले. या विक्रमी ऑर्डरमधून आमचे प्रबळ उत्‍पादन नूतनीकरण आणि ग्राहकांचा आमच्‍या इंजिन्‍सवरील सातत्‍यपूर्ण आत्‍मविश्‍वास दिसून येतो.

2. इंजिन्स

जीई९एक्‍स हे जगातील सर्वात शक्तिशाली व जीईचे सर्वात इंधन-कार्यक्षम टर्बोफॅन विमानाच्‍या बोईंग ७७७एक्‍स फॅमिलीला शक्‍ती देते. हे इंजिन त्‍याच्‍या श्रेणीमधील सर्वात कमी नायट्रोजन मोनोऑक्‍साईड उत्‍सर्जन देते, जे सध्‍याच्‍या नियामक आवश्‍यकतांपेक्षा ५५ टक्‍क्‍यांनी कमी आहे. पाउंड्स थ्रस्ट प्रति डेसिबलच्या आधारावर हे आतापर्यंतचे उत्‍पादित करण्‍यात आलेले सर्वात शांतपणे कार्य करणारे जीई इंजिन देखील आहे.

Air India
Air Indiacanva

बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरला शक्‍ती देणारे इंजिन जीईएनएक्‍समध्‍ये नवोन्‍मेष्‍कारी लीन बर्निंग ट्विन-अॅन्‍युलर प्री-स्‍वर्ल (टीएपीएस) कम्‍बस्‍टर आहे, जे आमच्‍या नियामक मर्यादांच्‍या तुलनेत मोठ्या प्रमाणात नायट्रोजन मोनोऑक्‍साईड व इतर नियमन केलेल्‍या वायूंना कमी करते, तसेच सीएफ-६ इंजिनच्‍या तुलनेत १५ टक्‍के सर्वोत्तम फ्यूएल बर्न करते.

लीप-१ए व लीप-१बी यांनी एकत्रित २७ दशलक्षहून अधिक उड्डाण तासांची नोंद केली आहे. लीप ऑपरेटर्स नवीन उत्‍पादित सीएफएम५६ इंजिन्‍सच्‍या तुलनेत इंधन कार्यक्षमता व कार्बन डायऑक्‍साईड उत्‍सर्जनांमध्‍ये जवळपास २० टक्‍के सुधारणांची नोंद करत आहेत, परिणामी सरासरी १७ दशलक्ष टनहून अधिक कार्बन डायऑक्‍साईड उत्‍सर्जन कमी झाले आहे.

3. सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूएल (एसएएफ)

जीई एरोस्पेस बोईंग ७७७एक्‍स साठी अनेक सिस्‍टम्‍स देखील प्रदान करते. यामध्ये एन्हांस्ड एअरबोर्न फ्लाइट रेकॉर्डर (ईएएफआर), इलेक्ट्रिकल लोड मॅनेजमेंट सिस्टम (ईएलएमएस) व बॅकअप जनरेटर, बॅकअप कन्व्हर्टर (बीयूजी/बीयूसी) आणि कॉमन कोर सिस्टम (सीसीएस) यांचा समावेश आहे. सीसीएसला विमानाचे सेंट्रल नर्व्‍हस सिस्‍टम अॅण्‍ड ब्रेन म्‍हटले जाते आणि ते विमानाचे एव्‍हीओनिक्स व उपयुक्तता कार्ये होस्ट करते, अनेक बॉक्स काढून टाकते आणि शेकडो पाउंड वायर कमी करते. जीई एरोस्पेस बोईंग ७८७ साठी सीसीएस आणि ईएएफआरचा देखील पुरवठा करते.

Air India
Travel Bag Hacks : ट्रॅव्हल बॅगशी संबंधित 'हे' हॅक करेल तुमचे काम सोपे !

जीई एरोस्पेस चार दशकांहून अधिक काळ भारतात कार्यरत आहे, ज्यामध्ये इंजिन, एव्हीओनिक्स, सेवा, अभियांत्रिकी, उत्पादन आणि स्थानिक सोर्सिंग अशा उद्योगांमधील व्यापक सहभाग आहे.

भारतातील बंगळुरू येथील जॉन एफ. वेल्च टेक्नोलॉजी सेंटर (जेएफडब्‍ल्‍यूटीसी) मधील अभियंत्यांनी आणि जीईच्‍या संशोधन व विकास केंद्राने विश्लेषण व चाचणी प्रमाणीकरण समर्थन प्रदान करून जीई९एक्‍स, जीईएनएक्‍स आणि सीएफएम लीप इंजिन्‍सच्या तंत्रज्ञान विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कार्बन डायऑक्‍साईड उत्सर्जन कमी करण्यासाठी नेक्स्ट-जेन तंत्रज्ञानाला समर्थन देण्यासाठी केंद्रात जवळपास १,००० अभियंते कार्यरत आहेत.

4. लीप सॅफ्रॅन एअरक्राफ्ट इंजिन्‍स व जीई यांच्‍यामधील ५०/५० संयुक्‍त कंपनी सीएफएम इंटरनॅशनलची ट्रेडमार्क आहे.

एअर इंडिया बाबत

दिग्गज जेआरडी टाटा यांनी स्थापन केलेल्या एअर इंडियाने भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात अग्रणी भूमिका बजावली. १५ ऑक्टोबर १९३२ रोजीच्या पहिल्या उड्डाणापासून एअर इंडियाचे विस्तृत देशांतर्गत नेटवर्क आहे आणि यूएसए, कॅनडा, यूके, युरोप, फार-ईस्‍ट, आग्‍नेय आशिया, ऑस्ट्रेलिया व गल्‍फ येथील संपूर्ण नेटवर्कसह एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपनी बनण्यासाठी आपली व्‍याप्‍ती पसरवली आहे. एअर इंडिया स्टार अलायन्स या सर्वात मोठ्या जागतिक विमान कंपनीची सदस्य आहे. सरकारी मालकीची एंटरप्राइझ म्हणून ६९ वर्षांनंतर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे जानेवारी २०२२ मध्ये टाटा ग्रुपमध्‍ये पुन्हा स्वागत करण्यात आले. एअर इंडियाचे सध्याचे व्यवस्थापन कंपनीला भारतीयांमध्‍ये जागतिक दर्जाची जागतिक विमान कंपनी म्‍हणून स्‍थापित करण्‍यासाठी Vihaan.AI च्या नेतृत्वाखाली पाच वर्षांच्या परिवर्तनाचा रोडमॅप चालवत आहे.

जीई एरोस्‍पेस बाबत

जीई एरोस्पेस हे या ऑफरिंगला समर्थन देण्यासाठी जागतिक सेवा नेटवर्कसह व्यावसायिक व लष्करी विमानांसाठी जेट इंजिन, कम्‍पोनण्‍ट्स आणि सिस्‍टमची जागतिक अग्रणी प्रदाता आहे. जीई एरोस्पेस व त्याच्या संयुक्त उद्यमांमध्‍ये ४०,००० हून अधिक व्यावसायिक आणि २६,००० लष्करी विमान इंजिनांचा स्‍थापित ताफा आहे. उड्डाणाचे भविष्य घडवण्यात हा व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com