Airtel Plan Hike: प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

दरम्यान एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीमध्ये वाढ होण्याची घोषणा करत युजर्सना मोठा झटका दिला आहे.
Airtel Plan Hike: प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर
Airtel Plan Hike: प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दरSaam Tv

मुंबई : टेलिकॉम कंपन्या telecom company आपल्या युजर्संना आकर्षित करण्याकरिता बाजारात नवीन आणि स्वस्त प्लॅन (Airtel Prepaid Plans) ऑफर करत आहेत. दरम्यान एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या (Airtel Prepaid Plans) किमतीमध्ये वाढ होण्याची घोषणा करत युजर्सना मोठा झटका दिला आहे. Airtel ने एकाच वेळी १५ प्रीपेड प्लॅन महाग करण्यात आले आहेत.

या प्लॅनच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. Airtel Plan Price Hiked आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या नवीन किमतीमध्ये २६ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. Also Read- Jio Freedom Plans : रिलायन्स जिओची धमाकेदार ऑफर, ग्राहकाकरिता आणले ५ नवीन प्रीपेड प्लॅन आणले आहेत. एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या टॅरिफ दरांमध्ये बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

या नवीन किंमतीत २६ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. म्हणजेच २६ नोव्हेंबरपासून तुम्हाला Airtel चा प्रीपेड प्लान खरेदी करण्याकरिता अगोदरपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने १५ प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवले आहेत. यामुळे लवकरच व्होडाफोन आणि जिओ देखील यूजर्संना धक्का देत त्यांचे प्लॅन महाग करू शकणार आहेत, अशी अपेक्षा आहे.

एअरटेलने २८ दिवसांची वैधता असलेल्या प्लॅन्सच्या ​​किंमती आता वाढवली आहे. यामुळे यूजर्सना आता एअरटेलचा ७५ रुपयांचा प्लान ९९ रुपयांमध्ये खरेदी करावा लगणार आहे. तर १४९ रुपयांच्या प्लॅनकरिता १७९ रुपये मोजावे लागणार आहेत. तर २१९ रुपयांचा प्लॅन आता २६५ रुपयांना मिळणार आहे. त्याचवेळी २४९ रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत २९८ रुपयांपर्यंत वाढली आहे. याशिवाय २९९ रुपयांच्या प्लॅनकरिता यूजर्सला ३५९ रुपये द्यावे लागणार आहेत.

५६ दिवसांची वैधता असलेल्या एअरटेलच्या प्लॅनविषयी बोलायचे, तर आता ३९९ रुपयांचा प्लॅन युजर्सना ४७९ रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. याचवेळी ४४९ रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत ५४९ रुपये करण्यात आली आहे. एअरटेलने आपल्या ८४ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची ​​किंमत देखील वाढवली आहे. यानंतर ४५५ रुपयांचा प्लॅन आता ५९८ रुपयांचा झाला आहे. तर ५९८ रुपयांच्या प्लॅनकरिता तुम्हाला ७१९ रुपये द्यावे लागणार आहेत.

Airtel Plan Hike: प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर
बेशरमाच्या फुलांनी खड्डे भरो आंदोलन करत... प्रशासनाचा निषेध...

त्याचवेळी ६९८ रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत ८३९ रुपये करण्यात आली आहे. एअरटेल ने देखील आपल्या ३६५ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची ​​किंमत देखील वाढवली आहे. यानंतर १४९८ रुपयांच्या प्लॅनसाठी यूजर्सला १७९९ रुपये खर्च करावे लागणार आहेत. याचवेळी २४९८ रुपयांचा प्लॅन आता महाग होणार आहे आणि २९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे.

एअरटेलने आपल्या डेटा अॅड- ऑन पॅकच्या किंमती मध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. आता ४८ रुपयांच्या प्लॅनसाठी यूजर्सला ५८ रुपये खर्च करावे लागत आहेत. त्याचवेळी, ९८ रुपयांचा प्लॅनला ११८ रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे, तर २५१ रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत ३०१ रुपये करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com