Airtelच्या ग्राहकांना झटका; या ठिकाणी ग्राहकांना रिजार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

हरियाणा आणि ओडिशामध्ये किमान मासिक योजनेच्या किमती 57 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
Airtel New Recharge Plan
Airtel New Recharge PlanSaam Tv

Airtel Recharge : एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने आपले मिनिमम रिचार्ज मोबाइल प्लान्स काही राज्यांमध्ये महाग केले आहेत. हरियाणा आणि ओडिशामध्ये किमान मासिक योजनेच्या किमती 57 टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक वर्षाच्या शेवटी टेलिकॉम कंपन्यांचे टॅरिफ प्लॅन महाग होत आहेत. गेल्या वर्षीही असेच झाले.

एअरटेलचे प्लान्स आधी महाग झाले, मग व्होडाफोन आयडिया आणि मग शेवटी रिलायन्स जिओने त्यांचे प्लान महाग केले. या वाढीनंतरही जिओचे प्लान्स इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. आता या वर्षीही एअरटेलने दरवाढ सुरू केली आहे. एअरटेलने आपल्या दोन प्लॅनच्या किंमती 57 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. मात्र, सध्या ही वाढ प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. आगामी काळात कंपनी त्यात पुन्हा बदल होऊ शकतात.

Airtel New Recharge Plan
सावधान! मोबाइलचं अतिवापर उडवतोय तुमची झोप; 'या' गंभीर आजाराचा धोका

टेलिकॉम टॉकने सर्वप्रथम एअरटेलचा प्लॅन महाग असल्याची माहिती दिली होती. रिपोर्टनुसार, एअरटेलच्या प्लॅनच्या किमती सध्या हरियाणा आणि ओडिशामध्ये वाढल्या आहेत. येत्या काळात महाराष्ट्रातही अशी दरवाढ होऊ शकते.

एअरटेलने या दोन्ही सर्कलमधील 99 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. एअरटेलचा 99 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह एंट्री लेव्हल पॅक होता. याशिवाय या प्लॅनमध्ये 200 एमबी डेटाही उपलब्ध होता.

Airtel New Recharge Plan
Smart Tv : One Plus Tv मिळतोय अवघ्या 10,000 किमतीत, 'या' ग्राहकांना विशेष सूट

एअरटेलच्या या निर्णयानंतर, कंपनीच्या प्लॅनची ​​सुरुवातीची किंमत आता 155 रुपये झाली आहे. नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना आता 28 दिवसांची वैधता आणि एकूण 1 GB डेटा मिळेल. याचाच अर्थ एअरटेलचे प्लॅन 57 टक्क्यांपर्यंत महाग झाले आहेत. एअरटेलच्या या निर्णयानंतर, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओचे प्लॅन देखील महाग होऊ शकतात. अद्याप कोणत्याही कंपनीने प्लॅनच्या किमतींबाबत कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जारी केलेले नाही.

एअरटेलने काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. एअरटेल पूर्वी आपल्या यूजर्सना 181, 399, 599, 839 आणि 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह मोफत डिस्ने+ हॉटस्टार सबस्क्रिप्शन देत होते. परंतु आता हे प्लॅन अपडेट केले आहेत. हे प्लॅन एअरटेलच्या वेबसाइटवर दिसत आहेत. परंतु Disney + Hotstar सबस्क्रिप्शन यात दिसत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com