Akash Ambani Car : आकाश अंबानीची जबरदस्त कार पाहिली का? किंमत जाणून चक्रावून जाल

Akash Ambani Car Collection : आकाश अंबानीची जबरदस्त कार पाहिली का? किंमत जाणून चक्रावून जाल
Akash Ambani Car
Akash Ambani Car Saam Tv

Akash Ambani Car : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याला आलिशान कारची खूप आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक आलिशान गाड्या आहेत.

अलीकडेच आकाश अंबानी मुंबईच्या रस्त्यावर लाल रंगाची फेरारी SF90 स्पोर्ट्स कार चालवताना दिसला होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फेरारी स्पोर्ट्स कारची भारतीय बाजारपेठेत प्रारंभिक किंमत 7.50 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Akash Ambani Car
Hyundai i20 : फेसलिफ्ट हॅचबॅक मॉडेल लॉन्च ! दमदार फीचर्स व नव्या लूकसह सर्वसामान्यांना परवडणार, जाणून घ्या किंमत

आकाश अंबानीच्या एका फॅन पेजने इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आकाश स्वतः कार चालवत असल्याचे दिसत आहे. फेरारी SF90 ही जगातील सर्वात आलिशान स्पोर्ट्स कारपैकी एक आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार भारतातील काही निवडक लोकांची खरेदी केली आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे यात रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसाठी 7.9 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. जी कारला 26 किमी (16 mi) पर्यंत इलेक्ट्रिक रेंज देते.

Akash Ambani Car
Numbers On Car Tyers : तुम्हाला माहीत आहे का ? कारच्या टायर्सवर नंबर का लिहिलेले असतात ?

Ferrari SF90 कशी आहे?

Ferrari SF90 मध्ये कंपनीने 3990cc क्षमतेचे 8 सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरले आहे. जे 769.31 Bhp पॉवर आणि 800Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये दोन सीट उपलब्ध आहेत आणि स्पोर्ट्स कार म्हणून 74 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे. (Latest Auto News in Marathi)

या कारमध्ये 68 लीटरची इंधन टाकी उपलब्ध आहे. 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सने सुसज्ज असलेल्या या कारमध्ये माईल्ड हायब्रिड सिस्टिम देण्यात आलीआहे. ज्यामुळे याची रेंज आणखी वाढते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com